गौतम अदानींची जोरदार मुसंडी, तर अंबानींना झुकेरबर्गने टाकलं मागे; श्रीमंतांच्या यादीत कोण कितव्या स्थानी?

बिझनेसनामा ऑनलाईन । हिंडनबर्ग रिपोर्टमुळे अडचणीत आलेले प्रसिद्ध भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीत अदानी यांनी टॉप 20 मध्ये एंट्री करत 18 वे स्थान पटकावले आहे. तर दुसरीकडे मुकेश अंबानी याना मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी मागे टाकलं आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर रिसर्चनुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती आता $64.2 अब्ज झाली आहे. त्यामुळे त्यांनी श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत पाच स्थानांची झेप घेत 18 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. तर फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलियनेअर इंडेक्समध्ये मात्र ते अजूनही 24 व्या क्रमांकावर आहेत. भारताचे दुसरे मोठे उद्योगपती असलेले मुकेश अंबानी हे ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या यादीनुसार, 86.1 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 13 व्या स्थानावर आहेत. तर त्याचवेळी मेटाचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी अंबानींना मागे टाकून ते ब्लूमबर्गच्या यादीत 10 व्या क्रमांकावर आहेत.

गौतम अडाणी यांच्याकडे आता एकूण 62.9 अरब डॉलर इतकी संपत्ती आहे. हिंडेनबर्गच्या रिपोर्टंनंतर अदानी यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आणि ते श्रीमंतांच्या यादीत थेट 36 व्या क्रमांकावर फेकले गेले होते. मात्र आता गेल्या काही काळापासून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. अदानी विल्मर, पॉवर आणि ट्रान्समिशन यांसारख्या शेअर्समध्ये चांगली तेजी आल्याने यामुळे अदानी समूहाची मार्केट कॅपही वाढली आणि मग गौतम अदानी यांची संपत्तीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.