Gautam Adani Big Deal : हिंडेनबर्ग या अमेरिकन संस्थेच्या अहवालानंतर अदानी समूहाने अनेक संकटांचा सामना केला. कंपनीला अनेक गुंतवणूकदार गमवावे लागले तर कित्येक महिन्यांसाठी त्यांच्या शेअर्सना उतरती कळा लागली होती. या सर्व प्रकरणाचा तपास देश विदेशातील अनेक एजन्सीजकडून केला जात होता, आणि ज्याच्या आधारे काही दिवसांपूर्वी अमेरिका सरकारने अदानी समूहाला क्लीन चिट दिली. या एका निर्णयामुळे क्षणार्धात समूहाचे दिवस पालटले. भारतात सुद्धा अदानी समूह आणि हिडेनबर्ग यांच्यातील वादाला पूर्णविराम देण्याचे प्रयत्न सर्वोच्य न्यायालयात सुरु असून हा निकाल पूर्णपणे समूहाच्या वतीने वळतो कि काय अशी चिन्हे दिसायला सुरुवात झाली आहे. या सर्व परिस्थतीचा अंदाज घेतला तर येणारं नवीन वर्ष समूहासाठी प्रगतीचं ठरू शकतं, कारण नवीन वर्षाची सुरुवात होण्याआधीच समूहाने कामाची आखणी तयार केली आहे.
2024 ठरणार का अदानी समूहासाठी खास? (Gautam Adani Big Deal)
हिडेनबर्गच्या अहवालामुळे नुकसान सोसल्यानंतर अदानी समूह पुन्हा एकदा कंबर कसून कामाला लागला आहे. अदानी समूहाचे मार्गक्रमण पाहता या नवीन वर्षात ते झालेल्या सर्व नुकसानीची भरपाई करतील अशी शक्यता वाटते. समूहाकडून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये केली जाणारी गुंतवणूक तसेच त्यांच्या शेअर्सना मिळालेली तेजी त्यांच्या प्रगतीचे स्पष्ट उदाहरण आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अदानी समूह हलवाड ट्रासनमिशन लिमिटेड या कंपनीचे अधिग्रहण करणार असून, त्यांनी या संबंधित करार पूर्ण केला आहे. या सोबतच अदानी ग्रीन या कंपनीने अदानी टोटलच्या संयुक्त विद्यमाने 300 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार नुकसानीची भरपाई करण्यासाठी सज्ज असलेला अदानी समूह नवीन वर्षांत हलवाड ट्रान्समिशन या कंपनीची जबाबदारी स्वीकारणार आहे. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असेल्या अदानी एनर्जी सोल्युशन्स या कंपनीकडून हलवाड ट्रासनमिशन्सचे 100 टक्के शेअर्स विकत घेण्यात येतील आणि या मोठ्या करारासाठी समूहाने PFC Consulting Limited सोबत हातमिळवणी केली आहे. 2023 वर्षाचे शेवटचे काही महिने उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी धक्कादायक ठरले. कंपनीला सोसाव्या लागलेल्या परिणामांमुळे गौतम अदानी यांचा जागतिक बाजारातील दर्जा देखील कमी होत होता. भारतात अदानी आणि अंबानी या दोन्ही उद्योगपतींना महत्वाचे स्थान प्राप्त आहे, मात्र हिडेनबर्गच्या एका अहवालानंतर त्यांच्या याच स्थानाला जबर धक्क बसला होता. 2023 मध्ये गंभीर परिस्थतीचा सामना केल्यानंतर, आता नवीन वर्षात वेगळीच ऊर्जा घेऊन बाजारात उतरलेला अदानी समूह नेमकी कशी कामगिरी करून दाखवतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.