Gautam Adani Deal: अदानी समूहाने 775 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आणखीन एक सिमेंट कंपनी

Gautam Adani Deal : हिंडेनबर्ग आणि गौतम अदानी यांच्यात सुरू असलेल्या वाद-विवादामुळे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे नेहमीच चर्चेचा विषय बनलेले असतात. सर्वोच्च न्यायालयाकडून आता गौतम अदानींना दिलासा देण्यात आल्यामुळे कंपनीचे शेअर्स दिवसेंदिवस प्रगती करत आहेत. मागचं संपूर्ण वर्ष हे अदानी समूहासाठी कठीण असलं, तरीदेखील त्यांनी परिस्थिती समोर हार मानली नव्हती, येणाऱ्या कठीण प्रसंगांना देखील समूहाने अगदी शिताफीने उत्तरं दिली होती. आता मात्र गौतम अदानी आणि अदानी समूहासाठी दिवस संपूर्णपणे पालटलेले असून आजच त्यांनी एक मोठा करार पूर्ण केला आहे. अदानी समूह आणि एका सिमेंट कंपनीचा हा करार यशस्वी झाल्याने अदानी समूह सिमेंटच्या क्षेत्रात आपलं नाव कोरण्याच्या तयारीत आहे. हा संपूर्ण करार अदानी समूह आणि Asian concretes and cement private limited या कंपनीमध्ये करण्यात संपन्न झाला आहे.

अदानींनी बनवलंय सिमेंट क्षेत्रात वर्चस्व: (Gautam Adani Deal)

अदानी समूहाच्या अंतर्गत येणाऱ्या ACC limited या सिमेंट कंपनीने एशियन काँक्रीट्स अँड सिमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत एका महत्वाच्या कराराला आज मंजुरी दिली. आज समूहाने या सिमेंट कंपनी मधला 55 टक्के हिस्सा खरेदी केल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. चर्चे दरम्यान समूहाच्या ACC Limited या कंपनीने ACCPL मधून हा स्टॉक खरेदी केला. एवढा मोठा करार पूर्ण झाल्यामुळे अदानींच्या सिमेंट कंपनीला आता एशियन कॉन्क्रीट आणि सिमेंटची संपूर्ण मालकी आली आहे. आणि या कराराला मंजुरी देऊन यशस्वीपणे तो पूर्ण केल्याने ACC Limited या कंपनीचे शेअर्स आज 2400 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करीत होते.

संपूर्ण करार पूर्ण करीत असताना ACC Limited या अदानी समूहाच्या कंपनीने एशियन काँक्रेट अँड सिमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा हिस्सा एकूण 775 कोटी रुपयांच्या एंटरप्राइज मूल्यात विकत घेतला, यामध्ये 35 कोटी रुपयांचा कॅश आणि कॅश इक्विव्हॅलंट यांचाही समावेश होता (Gautam Adani Deal). करार होण्याआधी अदानींकडे सदर कंपनीचा 45 टक्के भाग होताच, व आता तेवढा मोठा करार पूर्ण केल्यानंतर ACC आणि तिची मूळ कंपनी म्हणजेच अंबुजा सिमेंट उत्तर भारतात सर्वतोपरील आपलं स्थान पक्कं करण्यात यशस्वी झाले आहेत.

एशियन काँक्रीट अँड सिमेंट प्रायव्हेट लिमिटेड बद्दल थोडक्यात:

एशियन काँक्रीट अँड सिमेंट प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे ACCPL ही हिमाचल प्रदेशातील, नागालँड इथे एक सिमेंट कंपनी आहे. व त्यांची उप कंपनी एशियन फाईन सिमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही राजापूरा, पंजाब येथे कार्यरत आहे. अदानी समूहासोबत हात मिळवणी केल्यानंतर या कंपनीची सिमेंट क्षमता वाढली असून त्यांची उत्पादन क्षमता 38.5 MTPA झाली आहे. गेल्या सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये 33 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली होती व आता अदानी समूहासोबत हात मिळवणी केल्याने (Gautam Adani Deal) त्यांना अजून फायदा होण्याची शक्यता आहे.