Gautam Adani Deal: बांद्रा येथील पुनर्विकास प्रकल्पात अदानीची मोठी बाजी; आज केले बाजाराला चकित

Gautam Adani Deal: अदानींच्या कंपनीने मुंबईच्या बांद्रा परिसरातील तब्बल 24 एकर जमिनीच्या पुनर्विकासासाठी सर्वात मोठी बोली लावून धमाल केली आहे. या हक्काच्या जमिनीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) पुनर्विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी लार्सन अँड टुब्रो (L&T) सारख्या दिग्गज कंपनीला मागे टाकत अदानी रिअल्टी ही कंपनी विजेतेपद मिळवण्याच्या मार्गावर आहे.

अदानी समूहाने आज लावली सर्वात मोठी बोली: (Gautam Adani Deal)

आपल्या देशातील दोन दिग्गज कंपन्या – अदानी रिअल्टी आणि लार्सन अँड टुब्रो (L&T) यांनी महाराष्ट्रातील मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी घेण्यासाठी महाराष्ट्र शासनापुढे प्रयत्ननाची पराकाष्टा केली. आदानी रिअल्टी यांनी सरकारला प्रकल्पाच्या उत्पनाच्या 23.15 टक्के वाटा देण्याची ऑफर दिली आहे, तर दुसरीकडे L&T यांनी 18 टक्के वाटा देण्याचे सुचवले आहे. बांद्रा पुनर्विकास प्रकल्पाच्या लिलावात अदानी रियल्टी ही कंपनी उजवी ठरली हा लिलाव जिंकण्यासाठी आज अदानींनी मोठी रक्कम मोजण्याची तयारी दर्शवली हे मात्र नक्की.

मुंबईत सरकार उभारणार मोठा प्रकल्प:

मुंबईच्या मध्यवर्ती भागात समुद्राच्या किनाऱ्यावर आणि सी लिंकच्या जवळपास मुंबई महापालिका विकास प्राधिकरण (MSRDC) ने एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. तब्बल 45 लाख चौ. फूट क्षेत्राचा भव्य जमीन प्रकल्प इथे उभारला जाणार आहे. होय!! तुम्ही वाचले ते अगदीच बरोबर आहे. या जमिनीवर आलिशान हॉटेल्स आणि आरामदायक घरे उभारण्याची संधी निर्माण होणार आहे (Gautam Adani Deal). त्यामुळेच जर तुम्ही एक यशस्वी डेव्हलपर असाल, तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. या जमिनीची किंमत साधारणपणे 30,000 कोटी इतकी आहे, म्हणजेच हा एक महाकाय प्रकल्प ठरेल.