Gautam Adani: गौतम अदानींनीच्या संपत्तीत भरगोस वाढ; एकूण संपत्ती 101 अब्ज डॉलर्सच्या घरात

Gautam Adani: 2023 हे वर्ष भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्यासाठी वाईट ठरले होते. हिंडनबर्गच्या रिपोर्टमुळे अदानी समूहाच्या शेअर्सच्या किंमतीत मोठी घसरण झाली आणि अदानी यांच्या संपत्तीमध्ये मोठी घट झालेली पाहायला मिळाली. मात्र, 2024 हे नवीन वर्ष अदानी यांच्यासाठी शुभ ठरत आहे. अदानी समूहाच्या शेअर्सच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आणि त्यांची ऐकूण संपत्ती १०१ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. या निकालांमुळे ते जगातील श्रीमंतांच्या यादीत 12 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. लक्ष्यात घ्या की अदानी समूहाचा विविध क्षेत्रात व्यवसाय आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेत त्यांचा मोठा वाटा आहे.

Gautam Adani यांच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ:

ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार, अब्जाधीश गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये एकाच दिवसात 2.73 अब्ज डॉलर म्हणजेच 22,600 कोटी रुपयांहून अधिकची वाढ झाली, यामुळे त्यांची एकूण संपत्ती 101 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. या वाढीमुळे अदानी जगातील टॉप अब्जाधीशांच्या यादीत दोन क्रमांक वरती सरकले आहेत आणि म्हणूनच आता ते 12 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. हे यश गेल्या वर्षाच्या अखेरीस सुप्रीम कोर्टातून त्यांना मिळालेल्या मोठ्या दिलास्यानंतर आले असे म्हणायला हरकत नाही.

गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाल्यामुळे ते आता जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी यांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 1.1 अब्ज डॉलर म्हणजेच(सुमारे 9123 कोटी रुपये) वाढून 108 अब्ज डॉलर झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला गौतम अदानी(Gautam Adani) यांची एकूण संपत्ती 101 अब्ज डॉलर आहे, याचा अर्थ अदानी आणि अंबानी यांच्यातील संपत्तीतील अंतर आता फक्त 7 अब्ज डॉलर इतकेच उरले आहे.