Gautam Adani : आपल्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी. गेल्या काही दिवसांपासून गौतम अदानी आणि त्यांची कंपनी अनेक संकटांचा सामना करत होते. हिंडेनबर्ग हलवलानंतर गौतम अदानी यांच्यावर शंकेची सुई येऊन अडकली होती. मात्र आता भारतातील सर्वोच्य न्यायालयाने हे आरोप फोल आहेत असे म्हटल्यामुळे आणि अमेरिका सरकारने अदानी हे सर्वमार्गांनी निर्दोष आहेत असा निर्णय दिल्यामुळे अदानी समूहासाठी दिवस पालटले आहेत. त्यांच्या शेअर्समध्ये निकाल आलेल्या दिवसापासून तेजी आलेली पाहायला मिळाली तसेच गौतम अदानी यांची नेटवर्थ देखील परिणामार्थी वाढली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या मागोमाग असणारे गौतम अदानी येणाऱ्या काळात त्यांनाही मागे टाकतील यात काहीच शंका नाही.
गौतम अदानी यांची यशस्वी घोडदौड: (Gautam Adani)
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आता काहीसे बदल झाले आहेत. गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये आलेल्या तेजीनंतर हा बदल पाहायला मिळाला. एका मागून एक पायरी चढत गौतम अदानी पूर्वीची जागा हस्तगत करण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी 20 व्या स्थानी असलेले गौतम अदानी आता थेट 15 व्या स्थानावर येऊन पोहोचलेले आहेत. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणजेच रिलायन्स कंपनीचे मालक मुकेश अंबानी होय, ते सध्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 13व्या स्थानावर आहेत, मात्र अदानी यांनी जर का विजयी घोडदौड अशीच सुरु ठेवली तर काही दिवसांतच ते अंबानींनाही मागे टाकतील अशी शक्यता आहे.
गौतम अदानी 15 व्या स्थानावर:
गेल्या सहा महिन्यांपासून अनेक संकटांना सामोरे जाणाऱ्या अदानी समूहासाठी आता खरोखरीच दिवस बदलत आहेत. गेल्या तीन दिवसांत शेअर बाजारातील आकडयांनुसार अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती, याचमुळे गौतम अदानी यांचे नेटवर्थ वाढायला मदत झाली आहे. Bloomberg Billionaires Index सांगतो कि अदानी यांच्या संपत्तीत आता वाढ झालेली असून नवीन आकडा 82.5 डॉलर्सवर पोहोचला आहे, आणि म्हणूनच गौतम अदानी (Gautam Adani) हे थेट 15व्या स्थानावर जाऊन पोहोचले आहेत. मंगळवारी शेअर्समध्ये झालेली हि आकडेवाढ इलॉन मस्क आणि जेफ बेजोस यांच्यापेक्षाही अधिक होती.
मंगळवारी अदानी यांच्या नेटवर्थ मध्ये एकूण 12.3अरब डॉलर्सची वाढ झाली आहे. पाहायला गेलं तर सोमवार आणि मंगळवार अश्या दोन्ही दिवशी अदानी समूहाने एकूण 48.35 कोटी रुपयांची कमाई प्रत्येक मिनिटाला केली होती आणि सध्या तरी गौतम अदानी हेच जगातील श्रीमंतांच्या यादीत सर्वात अधिक नफा कमावणारे उद्योगपती ठरले आहेत.