Gautam Adani यांना मिळालंय जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये स्थान; नेटवर्थने 66.7 बिलियनचा आकडा केला पार

बिझनेसनामा ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांचा सामना करणारी कंपनी म्हणजेच Gautam Adani यांचा अदानी समूह. हिडनबर्गने केलेल्या आरोपांमुळे समूहासाठी गेले सहा महिने अदानी समूहासाठी अत्यंत बिकट ठरले आहेत. मात्र आता पुन्हा एकदा अदानी समूहासाठी अच्छे दिन येणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. आज माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार गौतम अदानी पुन्हा एकदा जगातील 20 सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून गणले गेले आहेत. काल अदानी समूहाच्या शेअर्समध्ये अचानक वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे आता अदानी समूहाचे बाजार मूल्य 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढले आहे. याच्याच परिणामी गौतम अदानी यांचे नाव Bloomberg billionaires list मध्ये सामील करण्यात आले असून आता ते जगातील 20 श्रीमंत लोकांपैकी एक बनले आहेत. गौतमदांनी यांच्या नेट वर्थमध्ये 6.5 बिलियन डॉलर्सची वाढ झालेली असून त्यांनी 66.7 बिलियनचा आकड पार केला आहे.

अदानी समूहाच्या शेअर्स साठी अच्छे दिन: (Gautam Adani)

मंगळवारच्या बाजरी अहवालानुसार अदानी समूहाच्या स्टॉक्स मध्ये जबरदस्त वाढ झालेली पाहायला मिळाली. कंपनीच्या शेअर्सनी 20 टक्क्यांपेक्षा जास्ती मोठा पल्ला गाठला होता. आणि म्हणूनच कंपनीचे मार्केट कॅप 1 लाख करोड रुपयांच्या ही पुढे गेलेले पाहायला मिळाले. स्टॉक एक्सचेंजवर सोमवार पर्यंत 10.27 लाख करोड रुपयांवर व्यवहार करणारे अदानी समूहाचे शेअर्स काल म्हणजेच मंगळवारी वाढून 11.31 लाख करोड रुपयांवर पोहोचले होते.

जानेवारी महिन्यात हिडनबर्ग कडून सादर करण्यात आलेल्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पहिल्यांदाच एवढी वाढ झालेली पाहायला मिळाली. सध्या अदानी समूह (Gautam Adani) आणि हिडनबर्ग यांच्या बद्दलचा निकाल सुप्रीम कोर्टने सर्वांसाठी जाहीर केलेला नसला तरी देखील संदर्भात बातम्यांच्या आधारेच कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे निकाल जर का अदानी समूहाच्या बाजूने लागला तर कंपनी पुन्हा एकदा आपले स्थान प्राप्त करेल यात कोणतीही शंका वाटत नाही.

मुकेश अंबानी तेराव्या स्थानावर:

आपल्या देशात सर्वात श्रीमंत माणूस म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती म्हणजेच मुकेश अंबानी. Plumber billionaire list यामध्ये मात्र मुकेश अंबानी यांना तेरावा स्थान देण्यात आलं आहे. मुकेश अंबानी यांची एकूण नेटवर्थ 89.5 डॉलर्सच्या आसपास आहे. या यादीत जर का सर्वोच्य स्थानी कोणाचे नाव असेल तर ते स्वतः एलोन मस्क आहेत, एलोन मस्क यांचे नेटवर्थ 228 बिलियन डॉलर्स आहे. तसेच अमेझॉनचे फाउंडर Jeff Bezos हे 171 बिलियन डॉलर नेटवर्थसह दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. आणि 167 बिलियन डॉलर्सचे नेटवर्थ असलेले बर्नार्ड ओरनोल्ट तिसऱ्या स्थानी पाहायला मिळतात.