Gautam Adani : गौतम अदानी आणि अमेरिकेतील शॉट सेलिंग कंपनी म्हणजेच हिंडेनबर्ग यांच्यामध्ये चाललेल्या वादावादीला आपण सर्वांनी पाहिलं आहे. अमेरिकेतील कंपनीने गौतम अदानी यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे गेलं पूर्ण वर्ष अदानी समूह अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करीत होता. रतन टाटा, मुकेश अंबानी यांच्यानंतर गौतम अदानी आहे आपल्या देशातील सर्वात मोठे उद्योगपती म्हणून गणले जातात मात्र हिंडेनबर्गने सादर केलेल्या एका अहवालामुळे अदानी समूह तसेच गौतम अदानी यांच्या वैयक्तिक संपत्तीला देखील मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली होती. हिंडेनबर्गने अदानी समूहाच्या विरोधात अहवाल सादर केल्यानंतर आता एक वर्ष पूर्ण झालंय आणि म्हणूनच गौतम अदानी यांनी माध्यमांसमोर येत यावर उघड-उघडपणे स्वतःचे मत मांडले आहे, त्यामुळे संपूर्ण प्रकाराबद्दल गौतम अदानी यांचं काय मत आहे हे आज जाणून घेऊया….
हिंडेनबर्गच्या अहवालाबद्दल काय म्हणाले Gautam Adani?
गौतम अदानी यांनी लिहिले की बरोबर एक वर्षापूर्वी 25 जानेवारी 2023 रोजी, नाश्त्याच्या वेळी त्यांना बातमी मिळाली की न्यूयॉर्कच्या शॉर्ट-सेलर कंपनीने त्यांच्यावर आरोपांचे बंडल जारी केले आहे आणि याला संशोधन अहवाल असे नाव देण्यात आलं होतं. अदानींच्या म्हणण्यानुसार, त्या अहवालात त्याच गोष्टी होत्या ज्यांचा वापर त्यांचे विरोधक मीडियामध्ये करत होते. अदानी यांनी लिहिले की, त्यांच्याविरुद्ध असे खोटे आणि निराधार अहवाल काही नवीन नाहीत.
या संपूर्ण घडामोडीबद्दल अदानी पुढे म्हणतात की, “सच जब जूते पहन रहा होता है, झूठ पूरी दुनिया घूम लेता है”, याचाच अर्थ असा की अदानींचा खरेपणा हाच या एकूण लढाईत त्यांचा सर्वात सक्षम आधार बनला. हिंडर्नबर्गने जाहीर केलेला अहवाल सर्वत्र पसरण्यास अधिक वेळ लागला नाही व याचा विपरीत परिणाम समूहाच्या मार्केट कॅप वर झालेला दिसला. लंडनवरून आलेल्या एका अहवालामुळे गौतम अदानी यांच्या छोट्या छोट्या गुंतवणूकदारांना नुकसान सोसावे लागले. अदानी म्हणतात की, जर का हिंडर्नबर्गचा हा कट यशस्वी झाला असता तर भारतातील समूहाचा एकूणच व्यवसाय कोलमडून गेला असता. मात्र या संपूर्ण प्रवासात गुंतवणूकदारांनी समूहावर तसेच गौतम अदानींवर कायमच विश्वास दाखवला व म्हणूनच हे संकट पार करण्याची जिद्द त्यांना मिळत राहिली.
अदानी(Gautam Adani) यांनी लिहिले की हिंडेनबर्गच्या हल्ल्यामुळे समूहातील एक मूलभूत कमकुवतपणा उघड झाला ज्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यांनी लिहिलं की या हल्ल्यानंतर त्यांना समजलं की त्यांनी संपर्क व्यवस्थेकडे पुरेसे लक्ष दिलेलं नाही. हिंडेनबर्ग हल्ल्यानंतरच्या गेल्या एक वर्षाने समूहाला अनेक मौल्यवान धडे दिले आहेत आणि त्यांना मजबूत केले आहे. अदानी यांचा सदर लेख वर्तमानपत्र टाइम्स ऑफ इंडिया मध्ये प्रकाशित करण्यात आला ज्यामध्ये पहिल्यांदाच गौतम अदानी यांनी संपूर्ण घडामोडी बद्दल उघडपणे वक्तव्य केले आहे.