Gautam Adani Success Story : गौतम अदानी हे नाव आज संपूर्ण भारतात प्रत्येकाच्याच तोंडी आहे. मग ते चांगल्या अर्थाने असो किंवा चुकीच्या अर्थाने असो…. अदानी यांचे नाव आज प्रत्येक घराघरात पोचलं आहे. देशात सर्वच क्षेत्रात अदानी यांचा दबदबा आहे. मात्र तुम्ही कधी गौतम अदानी यांच्या पूर्वआयुष्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? आज देश विदेशात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे अदानी हे लहानपणीपासूनच श्रीमंत होते का? अदानी समूह त्यांनी स्वतः स्थापन केला कि हि वडिलोपार्जित देण आहे? या सर्व प्रश्नांची आज उत्तरं जाणून घेऊयात..
कसं होतं गौतम अदानींचे बालपण?
आज यशाची शिखरं गाठत असलेले गौतम अदानी हे सेल्फ मेड मॅन आहेत. आज उभं केलेलं ऐश्वर्य आणि संपत्ती हे त्यांच्या कष्टाचे फळ आहे. त्यांचा जन्म गुजरातमधील अहमदबादचा, अदानींच्या लहानपणी त्यांचे कुटुंब अहमदाबाद मधल्या पोळ भागातील शेठ चाळीमध्ये राहायचं. कदाचित तुम्हाला हि माहिती खरी वाटणार नाही, पण एकेकाळी चाळीतलं जीवन जगलेला माणूस आज अब्जाधीश बनला आहे. वडिलांना घर चालवायला हातभार लावावा म्हणून वयाच्या 16 व्या वर्षीच त्यांनी घरोघरी जात साड्या विकायला सुरुवात केली होती.
गौतम अदानी यांनी सुरुवातीचं शिक्षण हे गुजरातमधून पूर्ण केलं. अहमदाबाद मधील शेठ चिमणलाल नागिनदास हि त्यांची शाळा (Gautam Adani Success Story). यानंतर गुजरात विद्यापीठात कॉमर्स विभागात प्रवेश मिळवून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि पुढील शिक्षणासाठी मुंबईचा रस्ता पकडला. मुंबईमध्ये पाहिलं पाऊल ठेवताना आजच्या उद्योगपतीच्या हातात केवळ 100 रुपयेच होते.
मुंबईमध्ये झाली व्यवसायाची सुरुवात: (Gautam Adani Success Story)
अदानींच्या स्वप्नांना खरी चालना मिळाली ती मुंबईमधूनच, इथे त्यांनी सर्वात आधी एका डायमंड सेंटर मधून कामाला सुरुवात केली होती. आणि पुढे काही वर्षांतच स्वतःची डायमंड ब्रोकरेज कंपनी सुरु देखील केली. थोडी वर्ष मुंबईमध्ये व्यवसाय सांभाळल्यानंतर ते गुजरातमध्ये परतले आणि भावाच्या प्लास्टिक कंपनीमध्ये कामात रुजू झाले. सुरुवातीच्या काळात कष्ट सहन केलेल्या अंबानींच्या हाती आज करोडो रुपयांची सत्ता आहे. तसेच अदानी समूहाचा व्यवसाय देखील दिवसेंदिवस वृद्धिंगत होतोय. या अब्जाधीश उद्योगपतींकडे अनेक घरं आहेत, अलीकडेच दिल्लीच्या लुटीयन्स या भागात त्यांनी खरेदी केलेल्या बंगल्याची किंमत 400 कोटी रुपयांपेक्षाही अधिक होती.
यश संपादन करत सध्या गौतम अदानी यांच्या संपत्तीने 85.9 अब्ज डॉलर्सचा आकडा गाठलाय, तसेच समूहाच्या कंपन्यांचे मार्केट कॅप हे 15 लाख रुपयांपेक्षाही अधिक आहे (Gautam Adani Success Story). ब्लूमबर्ग बिलियोनेअर्स इंडेक्सच्या अहवालानुसार श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी हे सध्या 15व्या क्रमांकावर असून त्यांची यशस्वी घोडदौड वेगाने सुरूच आहे.