बिझनेसनामा ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून रेमंड कंपनीचे मालक गौतम सिंघानिया (Gautam Singhania Case) चर्चेत आहेत. सिंघानिया यांच्या पत्नीने त्यांच्यावर मारहाण केल्याचे आरोप केलेत आणि म्हणूच लग्नाच्या 32 वर्षानंतर दोघांनी बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हि गोष्ट इथेच थांबत नाही, कारण नवाज मोदी -सिंघानिया यांनी पतीकडून 75 टक्के कंपनीचा हिस्सा मागितला आहे. काळ परवाच या सर्व घटनेवर काहीही न बोललेल्या गौतम सिंघानिया यांचे वडील विजयपत सिंघानिया यांनी आपले मौन तोडले आहे, मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या मुलाची बाजू न घेता सुनेच्या बाजूने विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गौतम सिंघानिया यांना वडिलांची साथ नाही: Gautam Singhania Case
सिंघानिया परिवारात चाललेले वाद- विवाद आता अनेकांच्या बोलण्याचा विषय बनले आहेत. गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी यांच्यात चालेले वाद अगदीच शिगेला पोहोचलेले आहेत, आणि अश्यात सिंघानिया यांचे वडील विजयपत सिंघानिया यांनी मुलाच्या विरुद्ध वक्तव्य केलेयाने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. गौतम सिंघानिया यांच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार कुठल्याच पालकांनी त्यांच्या मुलांवर आंधळा विश्वास ठेऊन मालमत्ता त्यांच्या नावे करू नये. कारण त्यानंतर गौतम सिंघानिया यांचं बदलेलं रूप मी पाहिलंय असं ते म्हणाले. स्वतःच्या वडिलांना रस्त्यावर आलेलं बघून गौतम यांना आनंद व्हायचा असं गंभीर वक्तव्य त्यांनी केलंय, जो माणूस वडिलांना अशी वागणूक देऊ शकतो तो पत्नीला देखील त्रास द्यायला मागे पुढे बघणार नाही असं म्हणत त्यांनी आपल्या सुनेची साथ दिली.
कंपनीच्या शेअर्सवर वाईट परिणाम:
गौतम सिंघानिया (Gautam Singhania Case) यांच्यावर पत्नीनेच गंभीर आरोप लावलेले असल्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. काही अंशी सिंघानिया यांचाबदल बाकी राहिलेली सहानुभूती त्यांच्या वडिलांनी केलेल्या वक्तव्यामुळे पूर्णपणे मिटून गेली आहे. आणि या गृहकालाहांचा सामना कंपनीला भोगावा लागत आहे. झालेल्या प्रकारामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. रेमंड कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये एकूण 1500 हजार करोड रुपयांची घसरण झाली आहे.