बिझनेसनामा ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून रेमंड कंपनीचे मालक गौतम सिंघानिया (Gautam Singhania) भरपूर चर्चेत आहेत. रेमंड हि कंपनी फारच प्रसिद्ध, लग्न किंवा इतर महत्वाच्या समारंभांसाठी ग्राहक रेमंडचे कपडे खरेदी करण्यासाठी धाव घेतात. मात्र सध्या कंपनीचे मालक आणि त्यांची पत्नी नवाझ मोदी सिंघानिया यांच्यात वादावादी सुरु आहे. दोघांमधले वाद आता शिगेला पोहोचले असून हे दांपत्य घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहे. नवाझ मोदी यांनी पतीकडून संपत्तीमधला 75 टक्के हिस्सा मागितला असून त्यांच्या विरोधात मारहाण करण्याचे आरोप देखील केले आहेत. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया…
Gautam Singhania प्रकरण नेमकं काय?
सलग 32 वर्षांच्या वैवाहिक जीवानंतर आता सिंघानिया दांपत्य घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहे. गौतम सिंघानिया हे भारतातील अनेक श्रीमंत उद्योजाकांपैकी एक असून त्यांची नेट वर्थ सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या आसपास आहे. सिंघानिया यांचा व्यवसाय केवळ कपड्यांच्या क्षेत्रात नसून रियल इस्टेटमध्ये देखील त्यांनी बऱ्यापैकी नशीब आजमावून बघितलंय. सध्या चालेल्या भांडणांनंतर सिंघानिया यांच्या पत्नीने स्वतःसाठी आणि मुलींसाठी एकूण रकमेतील 75 टक्के हिस्सा म्हणजे 8,250 कोटी रुपयांची मागणी केली आहे.
गौतम सिंघानिया यांच्यावर गंभीर आरोप:
गौतम सिंघानिया आणि नवाझ मोदी यांच्यात चाललेल्या घरगुती वादांनी आता घरचा उंबरा ओलाडला आहे. सिंघानिया यांच्यावर पत्नीकडून मारहाण करण्यासारखे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. मात्र गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांनी सदर प्रकरणावर अजून मौन कायम ठेवले असून ते म्हणतात कि कोणत्याही वादांपेक्षा त्यांना मुलींचे भविष्य आणि कंपनीचे हित जास्ती महत्वाचे आहे, आणि म्हणून ते अश्या खासगी मामल्यांवर खुलेआम चर्चा करणार नाहीत.