Gautam Singhania :देशात मागच्या अनेक दिवसांपासून गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी-सिंघानिया यांच्यातील वादांमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकरणामध्ये स्वतः गौतम सिंघानिया यांचे वडीलच त्यांच्या बाजूने नसल्यामुळे आणि वडिलांनी देखील त्यांच्यावर काही आरोप केले आल्यामुळे सिंघानिया पुन्हा एकदा वेगळ्याच वादाच्या भौऱ्यात अडकले आहेत. काल आलेल्या बातमीनुसार त्यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना संदेश पाठवून कंपनीचे कामकाज सुरळीतपणे चालू राहील असे आश्वासन दिले होते. चालेल्या प्रकरणाचा कुठे ना कुठेतरी मारा हा व्यवसाय आणि कंपनीला बसणारच होता, त्यामुळे सावध राहण्यासाठी गौतम सिंघानिया यांनी हे पाऊल उचलले असावे.
सिंघानिया प्रकरणाचा रेमंड कंपनीवर काय परिणाम? (Gautam Singhania)
गौतम सिंघानिया यांचे वडील विजयपथ सिंघानिया यांच्याकडून सुरू करण्यात आलेली कंपनी म्हणजेच रेमंड. रेमंड कंपन ही आज एक चर्चित आणि भरपूर नफा कमावणारी कंपनी नावलोकास आली आहे. मात्र गौतम सिंघानिया आणि त्यांच्या पत्नीमध्ये चाललेल्या वादविवादामुळे त्याचा वाईट परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसून आला आहे. काल म्हणजेच मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 4.99% घसरण पाहायला मिळाली होती. बिझनेस टाकून समजल्या जाणाऱ्या गौतम सिंघानिया आणि त्यांचे पत्नी नवाज मोदी यांच्यात चाललेल्या घटस्फोटांच्या चर्चांचा परिणाम रेमंड कंपनीच्या शेअर्स वर होताना दिसत आहे. सिंघानिया यांच्या पत्नीकडून लावण्यात आलेल्या गंभीर आरोपानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये होणारी ही घसरण त्यांच्यासाठी एक दुसरा जबर झटकाच म्हणावा लागेल.
गौतम सिंघानिया यांना द्यावी लागणार उत्तरं:
एका प्रॉक्सी सल्लागार फर्मने रेमंडच्या स्वतंत्र संचालकांना सिंघानिया यांच्यावर त्यांच्या पत्नीने केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. नवाज मोदी-सिंघानिया यांनी पती गौतम सिंघानिया यांच्या विरोधात मारहाणीचा आरोप लावल्यामुळे आणि कंपनीचा निधी वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याच्या गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची सूचना प्रॉक्सी फर्मने दिल्या आहेत. तसेच प्रॉक्सी ॲडव्हायझर फॉर्म इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर ॲडव्हायझरी सर्विसेस यांनी सिंघानिया दाम्पत्याला या चौकशी पासून दूर राहण्याचा आदेश दिला आहे.
यामुळे आता कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे, गेल्या काही दिवसांत शेअरच्या किमतीत झालेली लक्षणीय घट पाहता स्पष्टपणे समजते. एका बोर्ड सदस्याकडून दुसऱ्यावर इतके गंभीर आणि घृणास्पद आरोप होत असतानाही तुम्ही गप्प कसे आहात, असा प्रश्न सल्लागार संस्थेने संचालकांना केला आहे. तुमच्या मौनाचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो, असेही फर्मने म्हटले आहे.