Gautam Singhania : वादानंतर बिथरलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा; कंपनीचे कामकाज सुरळीत चालू राहील

Gautam Singhania । अनेक दिवसांपासून गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया वैयक्तिक मतभेदांमुळे चर्चेत आहेत. सिंघानिया यांच्या वडिलांनी सुद्धा त्यांच्या विरोधात मत व्यक्त केल्यामुळे ते कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या मनात आपले स्थान निश्चित करण्यासाठी त्यांनी सर्वांना E-mail द्वारे संदेश पाठवून सदर प्रकरणाबद्दल ते काहीही बोलणार नसल्याचा दावा केला आहे. गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांच्यावर लागलेले आरोप गंभीर आहेत आणि त्यांच्या पत्नीकडून करण्यात आले आहेत सोबतच कुटुंबाची साथ नसल्यामुळे गौतम सिंघानिया यांचे पारडे सध्या हलके आहे असेच म्हणावे लागेल.

गौतम सिंघानिया यांचा कर्मचाऱ्यांना संदेश : (Gautam Singhania)

रेमंड कंपनीचे मालक गौतम सिंघानिया यांनी सदर प्रकरणाबद्दल कर्मचारी वर्गाला संदेश पाठवला आहे. यात सिंघानिया म्हणतात कि, वयक्तिक वादाचा कोणताही परिणाम ते व्यवसाय आणि कंपनीच्या कामावर होऊ देणार नाही. कंपनीचे कामकाज आधीप्रमाणेच सुरु राहील असे आश्वासन त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहे. स्वतःच्या कौटुंबिक मामल्याबद्दल खुलेआम चर्चा त्यांना करायची नाही कारण यामुळे परिवाराच्या नावावर कलंक निर्माण होऊ शकतो, आणि परिवाराची प्रतिष्ठा जपण्यासाठी ते सदर विषयावर काहीही मत व्यक्त करणार नाहीत.

मात्र त्यांनी आपल्या कर्मचारी मंडळींना निश्चिंत राहत काम करण्याची विनंती केलेली आहे. सिंघानिया यांच्या वैयक्तिक वादाचा कोणताही परिणाम ते कंपनीच्या कामावर होऊ देणार नाही, तसेच त्यांचे कौटुंबिक वाद कधीही व्यवहारात अडथळा निर्माण करणार नाही. गौतम सिंघानिया म्हणतात कि गुंतवणूकदार, ग्राहक आणि कर्मचारी त्यांना उत्तर देण्यास ते बांधील आहेत तसेच त्यांचे हित शोधून त्यानुसार वागणे हि त्यांची जबाबदारी आहे. गौतम सिंघानिया (Gautam Singhania) आणि पत्नी यांच्यात चालेला वाद आता शिगेला पोहोचलेला असल्याने अनेक लोकं गौतम सिंघानिया यांच्यावर नजर रोखून आहेत, अश्यात त्यांनी उचलेले पाऊल उचलणे व्यवसायाच्या दृष्टीने आणि कर्मचाऱ्यांच्या मनात मालकाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन कायम ठेवण्यासाठी फारच गरजेचे होते.