GDP Growth In India : भारताच्या GDP मध्ये होणार सुधारणा; 2024 मध्ये होईल 6.4 टक्क्यांची वाढ

GDP Growth In India : भारतीय बाजारासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. काल म्हणजेच आठवड्याच्या सुरुवातीला न्यूयॉर्क हेडक्वार्टर्सच्या अंतर्गत काम करणाऱ्या ग्लोबल रेटिंग एजन्सीने (Global Rating Agency) येणाऱ्या काळात भारतीय बाजारात GDP आकड्यांमध्ये ही मोठी वाढ होईल असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.4 वाक्यांनी वाढताना दिसेल. लक्षात घ्या ग्लोबल रेटिंग एजन्सी ही जगातील सर्वात मोठी रेटिंग एजन्सी मानली जाते, त्यामुळे त्यांच्याकडून लावण्यात आलेला हा अंदाज जर का खरा ठरला तर भारतीय बाजारासाठी यापेक्षा वेगळी आनंदाची बातमी असू शकत नाही.

भारतीय बाजारासाठी आनंदाची बातमी : GDP Growth In India

ग्लोबल रेटिंग एजन्सीच्या वक्तव्यानुसार भारतीय बाजारामध्ये येणाऱ्या काळात GDP मध्ये मोठी वाढ होताना पाहायला मिळेल. ते म्हणतात की भारतीय अर्थव्यवस्थेला देशांतर्गत स्तरावर चांगला पाठिंबा मिळत आहे, याच्याच परिणामी इतर जगभरात वाढणारी महागाई आणि मंद निर्यात यांचा आपल्या अर्थव्यवस्थेच्या विकासावर कोणताही परिणाम दिसून येणार नाही. देशांतर्गत बाजारात जवळपास सर्वच स्तरावर भारत सध्या उत्कृष्ट कामगिरी करत असल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीत येणारे अडथळे आपोआपच दूर झाले आहेत.

वर्ष 2025 मध्ये दिसून येईल दबाव:

याआधी देखील अमेरिकेच्या एजन्सीने भारतीय अर्थव्यवस्थेत केवळ 6 टक्के वाढ होण्याचा संकेत दिला होता (GDP Growth In India). मात्र आता त्यांनी आर्थिक वर्ष 2024 साठी आपल्याला चांगला संकेत दिलेला असला तरीही आर्थिक वर्ष 2025 साठीच्या वाढीच्या अंदाजात त्यांनी मोठी कपात केली आहे, एजन्सीच्या अंदाजानुसार वर्ष 2025 मध्ये आपल्या देशातील GDP वाढीचा दर 6.9 टक्क्यांवरून 6.4 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. ते म्हणतात की वर्ष 2025 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवर काही प्रमाणात दबाव दिसून येऊ शकतो.