Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सोबत मिळवा 84 दिवसांची व्हॅलिडिटी

बिझनेसनामा । देशातील सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओकडून ग्राहकांसाठी अनेक आकर्षक प्लॅन ऑफर केले जातात. यामध्ये 100 रुपयांपेक्षा कमी ते 3,000 रुपयांपर्यंतचे प्लॅन्स ऑफर केले जातात. हे लक्षात घ्या कि, कंपनीकडे असेही अनेक प्‍लॅन आहेत, जे चांगली व्हॅलिडिटी आणि कमी किंमतींमध्ये उपलब्ध आहेत.

अशा परिस्थितीत, जर जिओच्या सर्वोत्तम प्लॅनबाबत बोलायचे झाले तर जिओकडून 395 रुपयांच्या प्लॅनची ऑफर दिली जात आहे. या प्लॅनची ​​सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी कि, यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि OTT बेनिफिट दिले जात आहेत. चला तर मग आज आपण जिओच्या 395 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणते फायदे दिले आहेत ते जाणून घेऊयात …

जिओच्या या 395 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. जास्त व्हॅलिडिटी असणारा प्लॅन हवा असणाऱ्यांसाठी जिओचा हा प्लॅन चांगला ठरू शकेल. यामध्ये एकदाच रिचार्ज करून 3 महिन्यांपर्यंत रिचार्ज करण्याचा त्रास वाचवता येईल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 6GB डेटा दिला जातो आहे. मात्र, हाय स्पीड 6 GB डेटा लिमिट संपल्यानंतर यामध्ये इंटरनेटचा स्पीड 64kbps वर येईल.

तसेच जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगही दिले जाते आहे. यासोबतच ग्राहकांना 1000 एसएमएस देखील मिळतील. या प्लॅनमधील अतिरिक्त फायद्यांबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये ग्राहकांना जिओच्या OTT चे फ्री सबस्क्रिप्शनही मिळते. ज्यामध्ये Jio TV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud उपलब्ध आहे.

जिओचा हा प्लॅन ऑनलाइनही रिचार्ज करता येईल. तसेच, हा प्लॅन MyJio App वर देखील उपलब्ध असेल. Jio 395 प्लॅन व्हॅल्यू पॅक कॅटेगिरी अंतर्गत लिस्टेड आहे.