बिझनेसनामा ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून भारतात विमानांचा प्रवास ठप्प झाला आहे. देशातील दोन विमान कंपन्यांची स्थिती बिकट असल्याने ही वाईट परिस्थिती उद्भवली आहे. गो फस्ट (Go First Airlines) आणि अकासा एअर(Akasa Air) या दोन विमान कंपन्याच्या विमान सेवा कमी झाल्यामुळे देशातील प्रवाशांना महाग तिकिटं खरेदी करावी लागत आहेत, हा काळ सणासुदीचा असल्यामुळे या वाढलेल्या किंमती चिंतेच कारण बनत आहेत. सध्या गो फस्ट या विमान कंपनीची विक्री सुरू आहे, या शर्यतीत अनेक पैसेवाले कंपनी विकत घेण्याची पुर्ण तयारी करत आहेत. मात्र या शर्यतीत सर्वात अनुभवी आणि कुशल खेळाडू जिंदाल गृप्स (Jindal Groups) ठरले आहेत आता गो फस्ट ही कंपनी जिंदाल समुहाच्या खात्यात जमा होईल का हे पाहणं आकर्षक ठरणार आहे…
जिंदाल घेणार का गो फस्ट विकत? (Go First Airlines)
समोर आलेल्या माहितीनुसार एका निनावी बेंकरने म्हटलं आहे की या विमानसेवा कंपनीला विकत घेण्यासाठी अनेक कंपन्या सज्ज आहेत, तरीही जिंदाल गृप्स हे सर्वात ताकदवान असल्याने गो फस्टची कंपनी जिंदालच्या समुहाचा भाग होईल याची जास्ती आशंका वाटते. ते असंही म्हटलेत की येणाऱ्या काही दिवसांत जिंदाल गृप्स कडून या संधार्भातील औपचारिक टप्पा पार केला जाईल. मात्र यात किती सत्य आहे याची शाश्वती देता येत नाही कारण गो फस्ट किंवा जिंदाल समुहाने यावर अजून तरी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. जिंदाल यांच्याशिवाय दोन विदेशी कंपन्यांनी सुध्दा गो फस्टला विकत घेण्यासाठी EOIE जाहीर केला होता.
अनेक दिवसांपासून बंद आहे विमानसेवा :
गेल्या काही दिवसांपासून गो फस्ट (Go First Airlines) या विमान कंपनीची सेवा ठप्प झाली आहे. गो फस्ट ही देशातील मध्यमवर्गीय लोकांना परवडणारी अशी विमान सेवा असल्यामुळे हा बदल त्यांना पचनी पडणारा मुळीच नाही. गो फस्ट कंपनी वाडीया समुहाकडून चालवली जाते. वर्ष 2005 मध्ये गो एअर (Go Air) या नावाने सुरू झालेली ही कंपनी चांगला नफा कमावत होती. मात्र आता कोव्हीड, इंधनाच्या किमतीत झालेली वाढ आणि इंजिनच्या बाबतीत झालेली गडबड अश्या अनेक प्रकारांमुळे सध्याच्या काळात ही कंपनी बॅंक करप्ट (Bank Corrupt) झाली आहे.
ही कंपनी बॅंक करप्ट झाल्यामुळे देशातील विमानसेवेचे भरपूर मोठे नुकसान झाले. साधारण 9% राष्ट्रीय विमानसेवेच्या शेअर्समध्ये यामुळे घसरण पाहायला मिळाली. अचानक बंद झालेल्या विमानसेवेमुळे प्रवाशांना विमान प्रवासात वाया जाणारा वेळ, तिकिटं रद्द होणे, महाग तिकिटं खरेदी करावी लागणे इत्यादी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. यामुळे इतर विमानसेवां वरचा जोर वाढला आहे, प्रवाशांचा आकडा अधिक व सेवेच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाल्याने ही वेळ ओढवली आहे. जवळपास 7,000 पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या या कंपनीचं झालेलं नुकसान यामुळे अनेकांनी नोकरी गमावली आहे. जरा का जिंदाल सारख्या सक्षम कंपनीने या विमानसेवेचं पालकत्व स्वीकारलं तर नक्कीच याचा फायदा गो फस्टला(Go First Airlines) पुन्हा उभारी घेण्यासाठी होऊ शकतो.