Go First Auction : गेल्या काही दिवसांपासून भारतीय विमान सेवांमध्ये काही ना काही बदल होत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. अनेक मोठं मोठाल्या विमान कंपन्यांना त्यांच्या कर्मचारी वर्गाने रामराम ठोकला होता आणि म्हणूनच देशातील अनेक प्रवाश्यांनी विमान उड्डाणाच्या बाबतीत कित्येक वेळा समस्यांचा सामना करावा लागला होता. अगदी सणासुदीच्या ऐन काळातच हि कठीण वेळ समोर आल्याने प्रवासी आणि कर्मचारी दोन्ही पक्ष नाराज झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा भारतीय विमान सेवा पूर्ववत होण्याच्या तयारीत आहे. आणि हे होणं अत्यंत महत्वाचं होतं कारण वेळेत एका दूरच्या जागी पोहोचण्यासाठी विमानाशिवाय बाकी पर्याय उपलब्ध नसतो आणि अश्या गोंधळात अनेक कामं आडकून पडतात. काही दिवसांपूर्वी विमान सेवांवर ओढवलेल्या या चक्रात गो फर्स्ट हि कंपनी देखील सापडली होती, आणि आज या कंपनी बद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे. काय? जाणून घेऊया…
गो फर्स्ट कंपनीचा होणार लिलाव: (Go First Auction)
मागच्या काही दिवसांमध्ये चालेल्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेली कंपनी म्हणजे गो फर्स्ट. आता लवकरच या कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव (Go First Auction) केला जाणार आहे.आणि हा लिलाव जर का योग्यरित्या पार पडला तर तर यातून 3 हजार कोटी रुपये उभे राहू शकतात. मे महिन्यापर्यंत अगदीच मंदावलेल्या स्थतीत काम करणाऱ्या गो फर्स्ट विमान सेवेने दिवाळीखोरीचा (Bankruptcy) अर्ज केला होता. यासाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आल्या होत्या, तसेच खरेदी करण्यात स्वारस्य दाखवणाऱ्या अभिव्यक्तींची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र त्यावेळी कोणाकडून या लिलावासाठी फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही म्हणूनच यात मुदतवाढ करण्यात आली होती.
कंपनीच्या डोक्यावर आहे कर्ज:
गो फर्स्ट हि विमानसेवा सामान्य माणसांना परवडेल अशी विमानसेवा म्हणून ओळखली जात होती. मात्र वरती म्हटल्याप्रमाणे मागचा काही काळ हा संपूर्ण विमान सेवेच्या क्षेत्रासाठीच कठीण ठरला आणि सारं चित्रच पालटलं. सध्या गो फर्स्ट या कंपनीच्या डोक्यावर 6521 कोटी रुपयांचे कर्ज आहे. कंपनीला कर्ज देणाऱ्या बँकांमध्ये बँक ऑफ बरोडा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, डॉइश बँक, IDBI बँक यांचा समावेश होतो.
मात्र तुम्हाला माहिती आहे का कंपनीने केवळ या बँकांकडूनच उधारी घेतलेली नाही तर या शिवाय इतर भाडेकरूंकडून 2 हजार कोटी, वेंडर्सकडून 1 हजार कोटी, ट्रॅव्हल एजंट्सकडून 600 कोटी आणि रिफंड ग्राहकांकडून 500 कोटी अशी मोठाली रक्कम डोक्यावर घेतली आहे. शिवाय यात कोरोना महामारीच्या काळात घेतलेल्या 1292 कोटी रुपयांचा देखील समावेश होतो, हे पैसे कंपनीने इमर्जन्सी क्रेडिट स्कीम मधून घेतले होते. या बिकट परिस्थतीमुळे आता कंपनी Bankruptcyच्या जाळयात अडकली आहे.
कंपनीचे मुख्य अधिकारी कौशिक खोना यांनी काही दिवसांपूर्वीच कंपनीचा राजीमाना दिला होता. वर्ष 2008 ते 2011 गो फर्स्टमध्ये ते कार्यरत होते आणि त्यानंतर 2020 मध्ये त्यांची CEO म्हणून नियुक्ती करण्यात अली होती. कंपनी सोडत असताना त्यांनी सर्व कर्मचाऱयांना ई-मेल द्वारे आपल्या राजीनाम्याची माहिती दिली होती.