Godrej Group : 126 वर्ष जुन्या गोदरेज ग्रुपचे होणार 2 तुकडे, काय आहे कारण?

बिझनेसनामा ऑनलाईन । गोदरेज ग्रुप (Godrej Group) हे नाव आपल्या देशात बऱ्यापैकी प्रसिध्द आहे. तुम्हाला माहिती आहे का हा व्यवसाय काही आज काल सुरु केलेला नाही तर तब्बल 126 वर्ष जुना आहे. सध्या हा व्यवसाय रियाल इस्टेट, ग्राहक उत्पादने, औद्योगिक अभियांत्रिकी, फर्निचर, कृषी उत्पादने, सौरक्षण अश्या अनेक स्थरांवर पसरलेला आहे. एवढं यश मिळवल्या नंतर मात्र गोदरेज ग्रुपमध्ये वाटाघाटी होण्याच्या बातम्या समोर येत आहेत. हे नेमकं प्रकरण काय आहे तेच आज आपण जाणून घेऊयात.

गोदरेज ग्रुपचे मालक हे एक पारसी कुटुंब आहे. या कुटुंबाकडून वर्ष 1897 मध्ये या व्यवसायाची सुरुवात करण्यात आली होती आणि आता हा व्यवसाय पूर्णपणे विस्तारलेला आहे. अर्देशीर गोदरेज आणि त्यांचे भाऊ फिरोजशहा बुर्जर्जी यांनी सोबत मिळून या व्यवसायाचा पाया रोवला होता. सध्या नादिर गोदरेज आणि त्यांचे चुलत भाऊ जमशीद गोदरेज यांच्या नेतृत्वाखाली हा व्यवसाय (Godrej Group) सुरु असून ते देशातील अनेक श्रीमंत घराण्यांपैकी एक आहेत. त्यांची एकूण मिळकत 1.76 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. मात्र सध्या या व्यवसायात वाटाघाटी सुरु आहेत व कदाचित याचे दोन तुकडे होऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे.

असे होईल गोदरेज समूहाचे विभाजन: (Godrej Group)

गोदरेजच्या व्यवसायात दोन गट आहेत, ज्यांना गोदरेज इंन्डसट्रीज एन्ड असोसिएट्स आणि गोदरेज एन्ड बॉयस मेन्यूफेक्चरिंग या नावाने ओळखलं जातं. या दोन्ही गटांची जबाबदारी आदी गोदरेज- नादिर आणि जमशेद गोदरेज -स्मिता कृष्णा सांभाळतात. दोन्ही गटांमध्ये येणाऱ्या काही काळात अभियांत्रिकी, सुरक्षा, कृषी उत्पादने, रियाल इस्टेट, उपकरणे आणि ग्राहक उद्पादाने यांसारख्या व्यावसायिक कंपन्यांचे विभाजन होणार आहे.

समोर आलेल्या माहितीप्रमाणे गोदरेज एन्ड बॉयसच्या अंतर्गत असलेल्या सुमारे 3,400 एकर जमिनीचे आणि इक्विटी क्रोस होल्डिंगचे विभाजन होणार आहे. कोणत्याही गोष्टीचे विभाजन करणे हि काही सोपी गोष्ट नाही, त्यामुळे यात सामील दोन्ही पक्षांसाठी एक समान ऑफर तयार केली जाईल. वर्ष 2019 मध्ये गोदरेज कुटुंबात विक्रोळी येते 1,000 एकर जमिनीवरून वाद सुरु झाला होता, यानंतर कौटुंबिक कलह वाढल्यामुळे हे विभाजन होत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.