बिझनेसनामा ऑनलाईन । सध्या देशाची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर बनल्याची कुजबुज सुरु आहे, आणि याला बढावा देण्यात अनेक मोठ्या राजकीय हस्ती सामील आहेत. मात्र अर्थ मंत्रालयाने याला दुजोरा न दिल्यामुळे पसरलेल्या या बातमीवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. चार ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला भरपूर मेहनत करावी लागणार आहे आणि हा पल्ला सहज साध्य होण्यासारखा नाही. देशाला ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यापासून अनेक गोष्टी मागे खेचत आहेत, आणि यांतीलच एक घटक म्हणजे सोन्याची आयात. का सोन्याची आयात (Gold Import) करणे आपली प्रगती रोखत आहे जाणून घेऊया…
सोन्याची आयात बनतेय का अडथला? (Gold Import)
सोन्याची खरेदी हा आपल्याकडे महिलांची विशेष पसंत आहे. वेगवेगळ्या सणांचे अवचीत्य साधून आपण सराफाच्या दुकानाकडे वळतो. अनेकवेळा सोन्याची खरेदी करण्यामागे गुंतवणुकीचा विचार देखील असू शकतो. मात्र सोन्याची हि वाढती मागणी आपल्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीवर दबाव टाकत आहे, बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी सोन्याची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते, भारत हा सोन्याची आयात करणाऱ्या अनेक मोठ्या देशांपैकी एक आहे.
यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात सोन्याची आयात तब्बल दोन टक्क्यांनी वाढली आहे. अलीकडचा काळ हा दिवाळी दसऱ्याचा असल्यामुळे अनेकांनी सोन्याची खरेदी केली, कारण हे दिवस खास करून सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी ओळखले जातात. पण या नादात आपल्याकडून 7.2 अब्ज डॉलर्स सोन्याची आयात करण्यात आली होती आणि सप्टेंबर महिन्यात 4 .1 अब्ज डॉलर्स सोने देशात आणले (Gold Import) गेले होते.
सोन्याचा खर्च थांबला तर पोहोचू 5 ट्रिलियन डॉलरवर:
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य निलेश शहा यांनी सोन्याची वाढलेली आयात या विषयी बोलताना सांगितले म्हटले कि आपण सोन्याच्या आयतीवरचा खर्च वेळीच रोखला असता तर निश्चितच आत्तापर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची बनली असती. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण गेल्या 21 वर्षांमध्ये सोन्याच्या आयातीवर(Gold Import) एकूण 500 अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. सध्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण GDP सुधारून 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनव्याचे उदिष्ट ठेऊन मार्गक्रमण करत आहोत.