Gold Investment : सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे कोणकोणते प्रकार आहेत ते जाणून घ्या

Gold Investment : दिवाळी आता अगदीच काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना, नवीन वस्तूंची खरेदी करायची आहे पण केवळ पैश्यांच्या अभावामुळे तुम्ही मागे फिरत आहात का? तर असं करू नका. आम्ही तुम्हाला गुंतवणुकीच्या काही भन्नाट कल्पना घेऊन आलो आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही अगदी सहजपणे तुमची यंदाची दिवाळी खास बनवू शकता. पहा गुंतवणुकीचे काही नवीन प्रकार, आणि आवश्यक सगळं काही…

1) फिजिकल गोल्ड:

आपल्या देशात सोन्यात गुंतवणूक (Gold Investment) करणे हा प्रकार अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे. फिजिकल गोल्डचा वापर करून तुम्ही सोन्याची नाणी किंवा दागिन्यांमध्ये गुंतवणूक सुरु करू शकता, एका विशिष्ठ टप्प्यानंतर सोन्याचा तुमचा असं एक वेगळा साठ तयार होईल. सोन्याच्या वस्तू जेव्हा आपण बाजारातून विकत घेतो तेव्हा त्यावर घडवणुकीचे शुल्क आकारले जाते, जो की प्रकार इथे पाहायला मिळत नाही. तरीही यात काही आर्थिक जोखीम पत्करावी लागू शकते त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या.

2) गोल्ड ETF : Gold Investment

गोल्ड ETF म्हणजेच एक्स्चेंज ट्रेडेड फंड. याचा प्रमुख उद्देश हा सोन्याच्या किमतींना ट्रेक करणे असं असतो. इथे होणारी हर एक गुंतवणूक हि सोन्याच्या किमतीवर अवलंबून असते. एक गोल्ड ETF हा एक गरम सोन्याच्या बरोबरचा असतो. तुम्ही स्टोक्स मध्ये केली गुंतवणूक पहिली असेल तर हा व्यवहार समजायला तुम्हाला सोपा जाईल कारण हा प्रकार काहीसा तसाच आहे. इथे 500 रुपयांच्या गुंतवणुकीपासून तुम्ही किरकोळ सुरुवात करू शकता.

3) सोवरेन गोल्ड बोन्डस:

सोन्याची गुंतवणूक (Gold Investment) करण्यासाठी सरकार कडून केली जाणारी हि एक तजवीज आहे. काही काळासाठी इथे तुम्हाला गुंतवणूक करावी लागते आणि त्यानंतर त्यावर हमखास व्याजदर देऊ केला जातो. सरकारी लायसन्स मिळालेल्या कंपन्यांसोबत गुंतवणूक केल्यास नक्कीच 99.5 टक्के शुध्द सोन्याची खरेदी करता येते. तसेच इथे खरेदी आणि विक्री करण्याची प्रक्रियाही अगदीच सोपी आणि समजेल अशी आहे.