सोन्यामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? ‘या’ आहेत Share Market मधील बेस्ट कंपन्या

बिझनेसनामा ऑनलाईन । भारतात सोने खरेदी करणे हे शुभ मानले जाते. सोन्याचे आकर्षण प्रत्येकालाच आहे. त्यामुळे खरंतर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ होऊनही सोन्याची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल हा सुरूच आहे. श्रीमंत लोक सोन्याकडे गुंतवणुकीचे एक साधन म्हणूनही बघतात. तुम्ही सुद्धा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी सर्वात बेस्ट पर्याय सुचवत आहोत. सोन्यामध्ये गुंतवणूक करून जास्तीचा रिटर्न मिळवायचा असेल तर गोल्ड विकणाऱ्या किंवा खरेदी करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे योग्य राहील.

जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी सोनं खरेदी करत असाल तर त्यापैकी एक पर्याय म्हणजे शेअर बाजारामध्ये गुंतवणूक . शेअर मार्केटमध्ये बऱ्याच अशा कंपनी आहेत ज्या सोनं खरेदी आणि विक्री करत असतात. आपण या कंपनीच्या शेअर्स मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करू शकता . शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हे जरी जास्त रिस्की असलं तरी त्यातून मोठ्या प्रमाणात रिटर्न सुद्धा मिळू शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक आणि स्वतःच्या रिस्क वर तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता.

शेअर मार्केट मध्ये सोन्याशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांबद्दल सांगायचं झाल्यास यामध्ये पीसी ज्वेलर्स, कल्याण ज्वेलर्स इंडिया, टायटन कंपनी, आणि राजेश एक्सपोर्ट्सचा या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. परंतु यामधील कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी याचा निर्णय तुम्हाला काळजीपूर्वक विचार करूनच घ्यायचा आहे.