Gold Mines In India : भारतात सापडली सोन्याची खाण,देश होणार काही दिवसांत मालामाल

Gold Mines In India | देशाच्या अर्थ व्यवस्थेसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जगातील एक मौल्यवान समजली जाणारी गोष्ट म्हणजे सोनं. ज्याच्याजवळ सोन्याचा भरपूर साठा आहे तो माणूस मालामाल झाला असंच आपण समजतो. पण तुम्हाला माहिती आहे का हीच गोष्ट कुणा एकाच्या नाही तर आपल्या संपूर्ण देशाच्या बाबतीत खरी ठरली आहे. आंध्र प्रदेशात काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा (Gold Mines In India) सापडला असून पुढच्या वर्षापासून यावर काम सुरु होण्याची शक्यता आहे.

देश होणार सोन्यामुळे मालामाल: (Gold Mines In India)

ज्या देशामध्ये सोन्याचा सर्वाधिक वापर केला जातो त्यात आपल्या भारताचे नाव सामील आहे. अनेक वर्षांपासून बाकी देशांकडून आपण सोनं विकत घ्यायचो, पण आता आलेल्या बातमीनुसार या सापडलेल्या नवीन साठ्यामुळे देशाची इतरांकडून सोनं विकत घेण्याची गरज कमी होऊ शकते. पुढच्या वर्षापासून या खासगी खाणीतून सोन्याचे उत्खनन (Gold Mines In India) सुरु होणार आहे . आंध्र प्रदेश येथील तुग्गली मंडलम येथे जोनागिरी नावाची हि खासगी खाण सापडली आहे. आणि यापुढे खाणीचे विकसन सर्व्हिसेस इंडियाकडून (Services India) केले जाणार आहे. या खाणीला वर्ष 2013 मध्ये मान्यता मिळाली होती व तिथे सोनं सापडायला 8 ते 10 वर्षांचा कालावधी गेला.

आपल्या देशात सर्वाधिक सोन्याचा साठा कर्नाटकात आहे. याशिवाय कोलार, एहुटी आणि उटी येथून सोन्याचे उत्पादन होते. देशात एकूण 1.6 टन सोन्याचे उत्पादन केले जाते, ज्यात 88 सोन्याचा साठा कर्नाटकात आहे. आता आंध्र प्रदेशात सोन्यचा नवीन साठा सापडला असून आणि काही प्रमाणात झारखंडमधेही सोन्याचं उत्खनन केलं जातं.

कोण आहे सर्व्हिस इंडिया कंपनी?

जिओमिसोर सर्व्हिस इंडिया लिमिटेड हि कंपनी देशातील पहिली आणि एकमेव सोनं शोधणारी कंपनी आहे, BSE वर देखील तुम्हाला या कंपनीचे नाव पाहायला मिळेल. हि कंपनी डेक्कन गोल्ड माइन्सचा (Deccan Gold Mines) 40% भाग आहे, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल कदाचित पण डेक्कन गोल्ड माइन्स या कंपनीच्या देशाबाहेर सुद्धा अनेक कंपन्या आहेत. या कंपनीचे संचालक हनुमान प्रसाद यांनी दिलेल्या माहिती नुसार या प्रकल्पाचे काम पुढच्या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच 2024च्या डिसेंबर पर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे. ते पुढे म्हणाले कि इथून सुमारे 750 किलो सोन्याचे उद्पादन होईल. या प्रकल्पात सध्या 200 रुपयांची गुंतवणूक झाली आहे व प्रायोगिक मुद्द्यांवर काम सुरु असून दर महिन्याला 1 किलो सोनं काढलं जात आहे.