Gold Price : गेल्या अनेक दिवसांपासून बाजारात सोन्या- चांदीची मागणी वाढत आहे आणि याचे प्रमुख कारण म्हणजे लग्न समारंभ. हा महिना लग्नसराईचा असणार आहे. आणि लग्न म्हटलं कि सोन्याची खरेदी आलीच. गेल्या महिन्यात देखील सोन्याच्या व्यापाराला भरपूर मागणी होती, दिवाळी आणि दसरा हे सोन्याच्या खरेदीसाठी उपयुक्त सण समजले जातात. काही अंशी इथे आपली श्रद्धा देखील जोडलेली असते, आणि अश्या एक- न -अनेक घटकांमुळे बाजारात सोन्याची मागणी वाढत गेली आहे. मागणी वाढत असली तरीही किमती मात्र सवर्सामान्यांना परवडणाऱ्या नाहीत, त्यामुळे येणाऱ्या काळात सोन्याच्या किमतींमध्ये काय बदल घडून येऊ शकतात याचा अंदाज जाणून घेऊया…
सोन्याच्या किमतींमध्ये बदल घडणार? Gold Price)
अद्याप तरी या क्षेत्रातले तज्ञ येणाऱ्या काळात म्हणजेच वर्ष 2024 पर्यंत सोन्याच्या किमती 68000 ते 72000 प्रती 10 ग्राम पर्यंत पोहोचतील अशी शक्यता वर्तवत आहेत. सध्या भारतीय बाजारात असलेला सोन्याचा दर हा सामान्य घरांना परवडणारा नाही, गेल्या 15 दिवसांत सोन्याचा स्पॉट दर 1989 रुपयांवरून वाढत 62607 रुपयांवर पोहोचलेला आहे आणि केवळ सोनेच नाही तर चांदी देखील 3714 रुपयांवरून वाढत थेट 75934 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. तज्ञ असेही सुचवतात कि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर सात महिन्यातील सर्वोच्य पातळीवर पोहोचले आहेत. मे महिन्यात सर्वोच्य पातळी गाठल्यानंतर गुरुवारी स्टोप गोल्ड सुमारे 2,041.76 डॉलर्स प्रती औंसवर व्यवहार करत होते, सराफ बाजारात बुधवारी सोन्याने 62775 रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता.
जगभरातील केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी:
जगभरातील अनेक बँका सोन्याची खरेदी करत आहेत. जुलै ते सप्टेंबरच्या महिन्यात या मागणीने नवीन उचांक गाठला होता, या तिमाहीत बँकांनी एकूण 1147 टन पेक्षाही अधिक सोन्याची मागणी केली होती. मागच्या पाच वर्षांच्या सरसरीत हि मागणी 8 टक्क्यांनी वाढलेली आहे(Gold Price). वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या नवीन बातमीनुसार केंद्रीय बँकांनी 800 टन सोन्याची खरेदी केली आहे, जी मागच्या नऊ वर्षांमधली सर्वाधिक खरेदी म्हणावी लागेल.