Gold Purchase Rules : सणासुदीला सोनं खरेदी करताय? त्याआधी आयकर विभागाचे ‘हे’ नियम जाणून घ्या

Gold Purchase Rules : धनत्रयोदशीचा दिवस हा सोन्याच्या खरेदीसाठी शुभ मानला जातो, त्यामुळे साहजिकच आज सोने खरेदीसाठी मोठी गर्दी सर्वत्र पाहायला मिळेल. पण काही गोष्टींची वेळेत खबरदारी घेऊन नंतरच सोने खरेदीकडे वळावं. सोन्याची खरेदीच केवळ महत्वाची नसून तुम्ही ते सोनं कुठे जपून आणि सांभाळून ठेवता हेही तेवढंच महत्वाचं आहे. काही सरकारी नियम या संदर्भात लागू केलेले आहेत, ज्यांचे उल्लंघन केल्यास मोठं नुकसान सोसावं लागू शकत. हे नियम कोणते याबद्दल आज जाणून घेऊया..

सोन्याची खरेदी करताना सर्वात महत्वाच्या गोष्टी कोणत्या? (Gold Purchase Rules)

अनेकवेळा सोन्याची खरेदी करत असताना ततुम्हाला पॅन कार्ड आणि KYC यांप्रमाणे दस्ताऐवज बरोबर ठेवण्याची गरज पडू शकते. पॅन कार्ड हे सर्वात महत्वाचं का आहे तर याच्या मदतीने काळा पैसा रोखला जाऊ शकतो, आणि परीणामार्थी काळ्या पैश्यांवर आळा बसतो. तुम्ही जर का दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचं सोने खरेदी करत असाल तर त्यावेळी तुम्हाला पॅन कार्ड दाखवणं अनिवार्य आहे. आयकर नियमांच्या कलम 114Bच्या अंतर्गत देशात हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे दुकानात जात असताना सोबत पॅन कार्ड घेऊनच सोने खरेदीला जावा, अन्यथा प्रॉब्लेम निर्मण होऊ शकतो.

या सोबतच अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर का रोख रक्कम देऊन तुम्ही सोन्याची खरेदी करणार असाल तर ती केवळ 2 लाख रुपयांपर्यंत सीमित ठेवावी लागणार आहे. यापुढची खरेदी करण्यासाठी तुमच्याजवळ पॅन कार्ड किंवा डेबिट, क्रेडीट कार्ड असणं गरजेचं आहे. आयकर नियमांप्रमाणे तुम्ही 2 लाख रुपयांपेक्षा अधिक सोन्याची खरेदी (Gold Purchase Rules) रक्कम देऊ करू शकत नाही, अशी चूक नजरेत आल्यास तुमच्या विरुद्ध कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे सोने खरेदी करत असताना ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा.