Gold Purchase : दिवाळीनिमित्त सोन्याची खरेदी करताय? या गोष्टी वाचा आणि फसवणूक टाळा

Gold Purchase : दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, आणि याची खरी मजा हि इतरांना आनंद देण्यात आहे. दिवाळीनिमित्त अनेकजण सोने खरेदी करत असतात. त्यामुळे सराफ दुकानात तुम्हाला तुडुंब गर्दी पाहायला मिळतेय. तुम्ही सुद्धा यंदाच्या दिवाळीत सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही काळजी घेण्याची गरज आहे. आज काळ जगात वावरत असताना आपण जेवढे सावध राहू त्यातच आपला फायदा असतो. अनेकवेळा केवळ जास्ती पैसा कमावण्यासाठी व्यापारी भेसळ सोन्याची विक्री करत असतात, त्यामुळे आज आम्ही काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत त्या काळजीपूर्वक वाचा आणि त्याचे पालन करा…

अश्या फसवणूकिंपासून वाचण्यासाठी सरकारने दागिन्यांवर हॉलमार्क असणे अनिवार्य केले आहे, मात्र आता केवळ या हॉलमार्कवर अवलंबून राहूनही काहीच फायदा होणार नाही, कारण बनावटीचे दागिने विकारे व्यापारी आता बनावटीचे हॉलमार्क्स देखील तयार करत आहेत. त्यामुळे नवीन दागिना घेतला केवळ हॉलमार्क पाहून खरेदी करायची नसते, तर आत्ता काही सांगणाऱ्या गोष्टी हि फारच महत्वाच्या आहेत.

योग्य सोन्याची पारख कशी कराल? Gold Purchase

सोन्याची खरेदी (Gold Purchase) करताना सर्वात महत्वाची गोष्ट असते ती हॉलमार्क तपासून घेणे. प्रत्येक दागिन्यावर BISचा हॉलमार्क असणे फारच महत्वाचे आहे. हा हॉलमार्क एका त्रिकोणात दर्शविला जातो, तोच हॉलमार्क बिलाच्या रकमेसोबत दिला गेलाय ना, बिलावर दिलेली रक्कम आणि हॉलमार्कची रक्कम जुळतेय कि नाही हे एकदा तपासून घ्या.

जर सोन्याचा हॉलमार्क 375 असेल तर ते 37.5 टक्के शुद्ध सोनं आहे. तसेच जर हॉलमार्क 999 असेल तर सोनं 99.9 टक्के शुद्ध आहे असा त्याचा अर्थ होतो. नवीन हॉलमार्किंग नियमानुसार आता सोन्याच्या घडवणूकीमध्ये 22 केरेट सोन्याचा वापर करणे अनिवार्य आहे ज्याची शुद्धता 91.6 टक्के असते आणि या नियमामुळे होणारी फसवणूक टाळता येते.

याशिवाय महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे केरेट तपासणे, मुळात खरेदी केलेलं सोनं हे 22 केरेट पर्यंत असणं गरजेचं आहे. शिवाय ज्या सराफाकडून तुम्ही खरेदी करत आहात तो तो खरा आहे, त्याचा व्यवसाय आतापर्यंत कसा चालला होता याची महती मिळवून मगच खरेदी करा.