Gold Rate Diwali 2023 : सोन्याची किंमत अजून घसरणार? दिवाळी, दसऱ्याला काय राहील सोन्याचा भाव?

Gold Rate Diwali 2023 : सोन्याची किंमत अजून घसरणार? दिवाळी दसरा होऊ शकतो खास..भारतात सणसुदींचा हंगाम (Festival Season) सुरु झाला आहे. आणि अश्यावेळी काही विशेष गोष्टींची खास करून केली जाते. ज्यात सोनं, चांदी, गाडी इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. या गोष्टी चैनीच्या नाही तर आवशयक आणि मौल्यवान आहेत. सणांचा काळ हा सकारात्मक समजला जातो, अश्यावेळी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ टिकतात अशी आपली संकल्पना आहे, आणि म्हणूनच या दिवसांमध्ये खासकरून या विशेष गोष्टींची खरेदी केली जाते. तुम्हाला ऐकून फारच आनंद होईल कि सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे व येणाऱ्याया दिवसांत अजून घसरण होण्याची शक्यता आहे त्यामुळे वर्षी दिवाळी दसऱ्याला तुम्ही सोन्याची(Gold Price) खरेदी करू शकता.

बाजरी भाव पाहत करा प्लेनिंग (Gold Rate Diwali 2023)

दिवाळी दसऱ्याच्या (Diwali 2023) वेळी सोनं विकत घेऊ पाहणाऱ्या लोकांसाठी हि बातमी आनंद देणारी आहे. कारण सोन्याच्या किमती घसरल्यामुळे सामान्य माणसांना त्याची खरेदी कारण सोपं होणार आहे. आपल्या देशात अधिकांश लोकं मध्यमवर्गीय आहेत, त्यामुळे कमी झालेले सोन्या चांदीचे भाव(Gold Price) आपल्यासाठी नेहमीच महत्वाचे असतात.

पितृपक्ष झाल्यानंतर लोकं सोन्या चांदीच्या खरेदीकडे वळतात. तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलंत तर या किमतींमध्ये सातत्याने घट होत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात अजून घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत मौल्यवान गोष्टींच्या खरेदीचं प्लेनिंग तुम्ही नक्कीच करू शकता.

सोन्याच्या किमती(Gold Price) घसरल्या:

अमेरिकी डॉलर्स मागच्या 11 महियांपासून तेजीत आहेत त्यामुळे सोन्याच्या किमती अंतराष्ट्रीय बाजारात घसरत आहेत. भारतीय बाजारात देखील सोन्याच्या किमतींमध्ये घट पाहायला मिळते. HDFC सेक्युरिटीजच्या अहवालानुसार मंदीच्या भीतीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर(Gold Price) अजून खाली येऊ शकतात. आपल्या बाजारात मागच्या सहा महिन्यात तब्बल 5,100 रुपयांनी सोने स्वस्त झाले आहे. 30 एप्रिल पर्यंत 61,899 रुपयांवर असलेल्या सोन्याची किंमत घसरून 56,251 रुपयांवर आली आहे. येत्या काही दिवसांत चीन मध्ये सुरु असलेल्या मंदीमुळे सोन्याचे दर अजून घसरू शकतात. 55,000 वरून प्रती सोन्याचा दर 53,000 होऊ शकतो.