Gold Rate : इस्रायल आणि हमास युद्धाचा सोन्या- चांदीच्या दरांवर गंभीर परिणाम

Gold Rate : गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायाल आणि हमास यांच्यात गंभीर युद्ध सुरु आहे. या युद्धाचा परिणाम म्हणजे अनेक निष्पाप बळी जाणे, घरं उध्वस्त होणे एवढाच नाही तर इस्रायल आणि सोबतच आजूबाजूच्या देशांवरसुद्धा होत आहे. भारताची इस्रायलमध्ये गुंतवणूक आहे तसेच गुगल सारख्या मोठमोठ्या कंपनीची ऑफिस तिथे आहेत. दिवसेंदिवस बिकट होत चालेल्या या परिस्थितीचा परिणाम बाजरी परिस्थितींवर झालेला पाहायला मिळतोय, अशातच एक बातमी समोर आली आहे कि चालू युध्याच्या परीणामार्थी सोन्याच्या भावांमध्ये बदल झाले आहेत.

सोन्याच्या किमतींवर झालाय असा परिणाम : (Gold Rate)

सध्या बाजारात सोन्याची किंमत 60 हजार रुपये प्रती तोळा अशी आहे, कारण युद्धाच्या परिणामामुळे सोन्याच्या किमतींमध्ये 3 हजारांची वाढ झाली आहे. आपल्या देशात हा काळ सणांचा आहे, दिवाळी दसरा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अशा वेळी बहुतेक लोकं सोन्याची खरेदी करतात. बाजारात सोन्याचे भाव वाढल्यामुळे अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. लोकं सोन्याच्या किमतींमध्ये घसरण होण्याची आतुरतेने वात पाहत आहेत.

गेल्या आठवड्यापर्यंत 57 हजार प्रती तोळा असा असलेला भाव आता वाढून 60 हजार प्रती तोळा असा झाला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या वृत्तानुसार सोन्या चांदीच्या भावात घसरण होण्याची शक्यता होती, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ उडाल्यामुळे याचा वाईट परिणाम सोन्याचा भावावर झाला आहे.

या किमती बदलण्याची शक्यता आहे का?

अद्याप तरी सोन्याच्या किमतीत (Gold Rate) सकारात्मक बदल होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. एवढेच नाही तर येणाऱ्या काही दिवसांत या किमतींमध्ये 500 ते 1000 रुपयांची अजून वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सोनं चांदी विकत घेऊ पाहणाऱ्या लोकांसाठी हि खरोखरच चिंतेची बातमी ठरली आहे. सोन्याच्या पाठोपाठ आता चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाली असून चांदी आता 72 वरून 73 हजार रुपयांना विकली जात आहे. बाजारी तज्ञांच्या माते सणांच्या काळात सोन्याच्या किमती 55 हजारांवर येणार अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र आता परिस्थती कुणाच्याही हातात नसल्यामुळे केवळ भाव कमी होण्याची वात पाहण्यावाचून काही पर्याय उरलेला नाही