Gold Rates : दिवाळीपूर्वीच सोनं झालंय स्वस्त, पटापट पहा दर

Gold Rates : दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि म्हणून नक्कीच तुम्ही सोन्या चांदीची खरेदी करण्याचा विचारात करत असाल. हो? तर हि बातमी खास तुमच्यासाठी आहे आणि आनंदाची आहे. दिवाळीपूर्वीच सोन्या चांदीच्या भावांमध्ये घसरण झाली असून येणाऱ्या काही काळात या दरांमध्ये अजून घट होण्याची शक्यता आहे. आपण मध्यमवर्गीय माणसं असल्यामुळे बाजारातील भाव आपल्यासाठी फारच महत्वाचे असतात. सणासुदीला आपल्या जवळच्या मंडळींना भेट देऊन खुश करावी अशी आपली इच्छा असते आणि तेव्हा काही टक्के रकमेत घट होईल अशी अपेक्षाही…

सोन्या चांदीचे भाव घसरले: Gold Rates

आपल्या परंपरेत धनत्रयोदशी दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे आणि यंदा धनत्रयोदशी 10 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. आनंदाची बातमी म्हणजे या आधीच महत्वाच्या वस्तूंच्या भावांमध्ये घट झाली आहे. यामुळे आता आगामी काळात सोन्या चांदीच्या खरेदीला जोर येणार आहे आणि अनेक लोकं आता बिनघोरपणे खरेदी करू शकणार आहेत. MCX वर सोन्याच्या किमती 200 रुपयांनी कमी झाल्या आहेत आणि आता सोने 242 रुपयांनी स्वस्त झाले आहे. सध्याचा सोन्याचा दर 60778 रुपये प्रती 10 ग्राम असा असून यात येणाऱ्या दिवसांत घट होऊ शकते (Gold Rates).

चांदीच्या दरांतही काही प्रमाणात घसरण झाली असून MCX वर चांदीच्या किमतीत 98 रुपयांची घट झाली आहे, सध्या चांदी 72154 रुपये प्रती किलो दराने विकली जात आहे. किरकोळ बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झालेली असून आता सोने 120 ते 170 रुपये प्रती 10 ग्राम एवढ्या कमी किमतीत विकले जात आहे. हि परिस्थती आपल्या फायद्याची असल्यामुळे वेळेतच याच फायदा करून घ्यावा व आपला सण अजून आनंदाने साजरा करावा.