Gold Rates :काही दिवसांपूर्वीच देवउठानी एकादशी पार पडली, म्हणजेच आता देशभरात लग्नांचा समारंभ सुरु होईल. लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस, या एका दिवसानंतर दोन माणसांची आयुष्य कायम स्वरूपी बदलून जाणारी असतात. मात्र आजकाल लग्न हा एका दृष्टीने व्यवहार बनला आहे. मोठमोठाले डेकोरेशंस ते स्वादिष्ठ पदार्थ सर्वच गोष्टी एकाहून एक आकर्षक आणि खास बनवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे लग्न हा केवळ एक विधिवत सोहळा राहिलेला नसून बाजारासाठी व्यवहाराचं एक साधन बनला आहे. लग्नाच्या वेळी सर्वात महत्वाची असते ती सोन्याची खरेदी, तर आज जाणून घेऊया काय आहेत सध्याचे सोन्याचे बाजारी भाव…
सोन्याचे बाजारी भाव परवडणारे आहेत का?
सोनं म्हणजे प्रत्येकाची आवड आणि हौशीचा भाग आहे, आणि लग्न समारंभ म्हटला कि सोन्याच्या खरेदीशिवाय तो अपूर्णच असतो, त्यामुळे आज जाणून घेऊया सोन्याचे सध्या बाजी भाव काय आहेत. लग्न सराई सुरु झाली आणि सोन्या-चांदीच्या (Gold Rates) भावांनी देखील महागाईचा पल्ला गाठायला सुरुवात केलेली आहे, यामुळे आता घरात लग्न कार्य काढलेल्या सर्वसामान्य कुटुंबांवर दबाव येण्याची भरपूर शक्यता आहे. सराफांच्या म्हणण्यानुसार बाजारात खरेदी वाढलेली आहे, तरीही खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हे भाव म्हणजे डोकेदुखीच म्हणावी लागेल.
काय आहेत सोन्याचे नवीन भाव (Gold Rates)?
आत्ताचा बाजारी अंदाज पहिला तर सोने प्रति 10 ग्रॅम 62 हजारावर तर चांदी प्रति किलो 75 हजार 100 रुपयांवर पोहचली आहे. मागच्या काही दिवसांपासून या दरांमध्ये काही अंशी चढ उतार पाहायला मिळत होता, तरीही आता सोन्याच्या भावांनी अचानक बरीच लांब उडी घेतलेली आहे. या आठवड्यात सोन्याच्या किमतींमध्ये 700 रुपयांची वाढ झाली आहे आणि चांदीचा दर 1200 रुपयांनी वाढला आहे. गेल्या शुक्रवारी सोन्याचे दर 61,900 रुपयांवर होते तर चांदी प्रति किलो 74,800 रुपयांवर व्यवहार करीत होती.
काही दिवसांपूर्वी सोन्याच्या किमतींनी थोडा दिलासा दिला होता खरा पण आता पुन्हा हे दर वाढत्या पट्टीत पाहायला मिळतात. मराठी घरांमध्ये तुळशीच्या लग्नानंतर लग्न समारंभ सुरु होतात त्यामुळे ऐनवेळी झालेली हि आकडेवाढ लगीनघरात चिंतेचे वातावरण तयार करू शकते(Gold Rates). मागच्या काही दिवसांपासून जागतिक महागाई वाढतच होती, आणि आता त्याचे सवट लग्नाच्या खरेदीवर पडले आहे. तज्ञांच्या माते येणाऱ्या काळात सोन्या चांदीच्या किमतींमध्ये अजून जास्ती वाढ अपेक्षित आहे.