Gold Rates Today: आज डिसेंबर महिन्याचा पहिला दिवस, आणि वर्ष 2023 याचा शेवटचा महिना. आपण वर्षाच्या एकदम शेवटच्या टप्प्यावर असताना आज सकाळी GDP च्या आकड्यांमध्ये सकारात्मक वाढ नोंदवण्यात आल्याची एक चांगली बातमी समोर आली होती. जागतिक स्तरावर अनेक देश त्यांची अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करत असताना, आपला भारत GDP च्या बाबतीत पूर्णपणे भक्कम स्थितीत असल्यामुळे देशातील सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र या आनंदाच्या बातमी सोबतच खिशाला कात्री लावणारी अजून एक बातमी माध्यमांना मिळाली आहे , ती म्हणजे LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये झालेली वीस रुपयांची वाढ होय, पण महागाईचा फटका हा केवळ सिलेंडरच्या बाबतीतच बसणार नसून सोन्याच्या किमतीतही वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे…
वर्षाच्या अखेरीस सोन्याच्या किमतीत वाढ: (Gold Rates Today)
डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या आणि चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. सध्या देशात सगळीकडेच लग्नाचा हंगाम असल्यामुळे सोन्या-चांदीला मिळणारी मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे .बाजारी परिस्थिती सोन्याला अधिकाधिक मागणी देत असताना सोन्याच्या किमतीत झालेली वाढ ही सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला नक्कीच कात्री लावून जाईल, त्याप्रमाणे अनेकांसाठी ही वाढणारी महागाई डोकेदुखी सुद्धा बनू शकते.
सध्या 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 5,770 रुपये अशी आहे आणि 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 6,295 रुपये आहे. पण इथेच घाबरून जाऊ नका कारण 10 ग्रॅम सोन्याची किंमत ऐकून नक्कीच तुम्ही आश्चर्याने थक्क होणार आहात,10 ग्रॅम 24 कॅरेट सोने सध्या 62,950 रुपयांवर व्यवहार करीत आहे. आपल्या जवळचे शहर म्हणजे पुणे आणि मुंबई या ठिकाणी 10 ग्रॅम सोन्याचे भाव 63,820 हजार रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत.
सोनं विकत घेताना त्याची पारख कशी करावी?
भारत सरकारद्वारे सोन्याच्या खरेदी दरम्यान होणारी फसवणूक टाळण्यासाठी सोन्याच्या प्रत्येक दागिन्यावर एक हॉलमार्क दिला जावा असा आदेश जारी केला आहे. त्यामुळे केवळ हॉलमार्कचे चिन्ह असलेलेच दागिनेच खरेदी करावेत. भारत सरकारच्या अंतर्गत ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डस यांच्याकडून हा हॉलमार्क ठरवला जातो आणि हॉलमार्क असलेल्या दागिन्याची खरेदी (Gold Rates Today) करणे म्हणजेच सरकारने मंजुरी दिलेल्या सोन्याची खरेदी करणे होय.
24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर 18 कॅरेट सोन्यावर 750 असा हॉलमार्क दिला गेलेला असतो. सोन्याची खरेदी करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी ती म्हणजेच जेवढे जास्त कॅरट,तेवढीच सोन्याची शुद्धता ही अधिक असते. या व्यतिरिक्त तुम्ही ओळखीच्या आणि विश्वास ठेवला जाईल अशाच सराफाकडून सोन्याची खरेदी करावी, त्याचप्रमाणे खरेदी केल्यानंतर दुकानदाराकडून पावती घेण्यास कधीही विसरू नये.