Google India: गुगल ही टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी भारतातील 10 कंपन्यांचे Apps हटवू शकते. यात लोकप्रिय Matrimony Apps सुद्धा असण्याची दाट शक्यता आहे. सेवा शुल्क देण्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे गुगल हे पाऊल उचलू शकते, अशी माहिती माध्यमांना मिळाली आहे आणि यामुळे भारतीय Starup कंपन्यांमधील तणाव वाढण्याची भीती वाढली आहे.
गुगल हटवणार काही Apps: (Google India)
भारतातील Startup कंपन्यांकडून in-app payments वर Google ने 11 ते 26 टक्के सेवा शुल्क (service fee) लावण्याच्या निर्णयाला विरोध केला जात आहे. याआधी, Google 15 ते 30 टक्के शुल्क आकारत होते. मात्र, Antitrust authorities ने Google ला ही आधीची पद्धत मोडून काढण्याचा आदेश दिल्यानंतर हा वाद निर्माण झाला आणि या नव्या शुल्कामुळे भारतातील Startups ना मोठा फटका बसू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.
सर्वोच्य न्यायालयाची गुगलला परवानगी?
जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये झालेल्या न्यायालयीन निर्णयांमुळे गूगलला कमिशन आकारण्याची परवानगी मिळाली. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने Startups ना दिलासा देण्यास नकार दिल्याने गूगलसाठी ही बातमी आनंदायी ठरली. त्यानुसार, गूगलने भारतातील कंपन्यांना Play Store च्या नियमांचे उल्लंघन केल्याची नोटीस बजावली आहे. यामध्ये भारत Matrimony App चालवणारी कंपनी Matrimony.com आणि Jeevansathi App चालवणारी Info Edge यांचा समावेश होतो.
गुगलच्या निर्णयामुळे Startups धोक्यात:
गुगलकडून Apps हटवले जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने चिंता वाढली आहे. आपल्या देशात 94 Smartphones वर गुगलचा Android Platform वापरला जातो, त्यामुळे कंपन्यांचे Apps हटवल्यास मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ शकतात(Google India). मात्र गुगल म्हणतोय, त्यांच्या सेवा शुल्कांमुळे App Store आणि Android OS मध्ये गुंतवणूक केली जाते. त्यामुळे मोफत वितरण, Developer Tools आणि विश्लेषणात्मक सेवांचा खर्च भागवला जातो. 2 लाखांहून अधिक भारतीय Developers पैकी फक्त 3 टक्क्यांना सेवा शुल्क भरणे आवश्यक असल्याचेही गुगलने स्पष्ट केले आहे.