Google Layoffs: गेल्या काही दिवसांपासून अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत. हल्लीच LinkedIn कडून बऱ्याच कर्मचारी वर्गाला कामावरून बाजूला करण्यात आलं, आणि आता संपूर्ण जगात ओळखली जाणारी दिग्गज कंपनी Google हि देखील काही कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. समोर आलेली माहिती सागते कि Google जवळपास 40 ते 45 नोकऱ्या कमी करणार आहे. जगात आर्थिक मंदी सुरु असताना महागाईचे दर वाढत जात आहेत, अश्यात हातातील नोकऱ्या गमावणं हे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने धोक्याची घंटा म्हणावी लागेल.
गुगल कमी करतोय कर्मचारी: Google Layoffs
गुगल कडून आलेली माहिती सांगते कि गुगलच्या बातमी (News) विभागात सध्या शंभर अधिकारी काम करतात, आणि कंपनी यांव्यतिरिक्त 40 ते 45 कर्मचारी वर्गाला कामावरून कमी (Google Layoffs) करणार आहे. गूगलचा बातमी विभाग त्यांच्या वाचकांना आवडतील आणि त्यांच्यासाठी महत्वाच्या असलेल्या बातम्या वेगवेगळ्या प्लेटफोर्म्स वरून गोळा करून आणून देत असतो . केवळ ‘News’ असा इनपुट जरी आपण गुगलला दिला तरीही तो महत्वाच्या आणि आत्ताच्या घडीला घडणाऱ्या (Current News) आपल्यासमोर आणून ठेवतो. आता या विभागात काही बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे काही कर्मचारी वर्गावर याचा विपरीत परिणाम झालेला दिसतो.
अनेक टेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना निलंबित:
तुमच्या वाचनात हल्लीच एक बातमी आली असेल कि जगातील अनेक मोठमोठ्या टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ताजी बातमी हि LinkedIn या कंपनीकडून समोर येते, LinkedInने सुमारे 668 कर्मचाऱ्यांना बेदखल केले आहे. काही महिन्यांपूवी गुगलचीच एक उपकंपनी असलेली अल्फाबेट (Alphabet) मधून कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार अशी बातमी समोर येत होती. गुगल आणि अल्फाबेट मधून सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांना हटवण्यात येणार अशी चर्चा सुरु होती, महामारीच्या काळात कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला होता.