Google Make In India Smartphone । जगभरात टेक्नोलोजीचा व्यवसाय अगदी जोरात सुरु आहे, काही टेक कंपन्यांनी जरी काही कर्मचाऱ्यांना हटवले असले तरीही त्यांच्या व्यवसायात तेजी पाहायला मिळते. याच जगभरातील कंपन्या भारतात आपल्या व्यवसाय वाढवू पाहतात, याआधी भारता Apple ने सुरुवात केली होती. या मेक इन इंडिया मोहिमेत आता भर पडली ती गुगलची. जगातील या सर्वात मोठ्या टेक कंपनीने आता भारतात Google Pixal मोबाईल फोनची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे.
भारतात तयार होणार Google Pixal: Google Make In India Smartphone
Apple सारख्या दिग्गज कंपनीनंतर आता Google भारतात आपल्या व्यवसाय सुरु करू पाहत आहे. गुगल कंपनीचे CEO सुंदर पिचाई यांनी माहिती दिली आहे कि येणाऱ्या काही दिवसांतच कंपनीकडून Google Pixal हा मोबाईल भारतीय बाजारात लोंच केला जाईल. भारतात जर का गुगलने आपले दुकान थाटले तर तीन मोठ्या कंपन्यांमध्ये त्रिकोणी युद्ध पाहायला मिळेल. हि स्पर्धा Google, Apple आणि Samsung या कंपन्यांमधली असेल.
सुंदर पिचाई अजून काय म्हणाले?
X म्हणजेच ट्वीटरच्या माध्यमातून गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी सांगितले कि भारतात कंपनीकडून Google Pixal चे उत्पादन सुरु केले जाईल, आणि कंपनीचा पहिला मोबाईल वर्ष 2024 मध्ये बाजारात येण्याची (Google Make In India Smartphone) शक्यता आहे. ते म्हणतात कि भारतात डिजिटल पद्धतींचा वापर वाढला आहे आणि अश्यात त्यांनाही भारतीय बाजाराचा एक भाग व्हायची इच्छा आहे.
मात्र Google Pixal या मोबाईल फोनची किंमत काय असेल याची माहिती पिचाई यांनी समोर आणली नाही. Apple आपले मोबाईल फोन भारतात अजूनही असेम्बलच करतो. मग आता Google Pixal भारतात नेमके फोन तयार करेल कि असेम्बल करेल हा प्रश्न देखील अनुत्तरीत राहीला आहे, या प्रश्नाचे उत्तर समोर आले कि नंतरच फोनची किंमत काय असेल याचा अंदाज लावणे शक्य आहे.