Google Pay Cibil Score : गुगल पे वरून चेक करा तुमचा Cibil Score; या स्टेप्स फॉलो करा

Google Pay Cibil Score । आज काल डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढलेलं आहे. भारतात गुगल पे, पेटीएम, फोनपे या अँप्सच्या माध्यमातून एकमेकांना ऑनलाईन पद्धतीने आणि कमी वेळेत पैसे पाठवू शकतो. ग्राहकांचा मोठा प्रतिसाद पाहून प्रत्येक अँप आपल्या यूजर्ससाठी वेगवेगळे अपडेट घेऊन येत असते. आता गुगल पे ने सुद्धा आपल्या यूजर्ससाठी असच एक नवं फिचर आणलं आहे ज्यामाध्यमातून तुम्ही आता तुमचा सिबिल स्कोर सुद्धा गुगल पे वरून चेक (Google Pay Cibil Score) करू शकता. एवढेच नव्हे तर गुगल पे वर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर इन्स्टंट पर्सनल लोन देखील मिळू शकते .

जर तुम्हाला छोटा किंवा मोठा बिझनेस सुरू करायचा असेल तर बँक लोन ची गरज प्रत्येकाला पडत असते. त्याचबरोबर आजकाल लोक महागड्या वस्तू किंवा गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेतून लोन घेत असतात. बँकेतून लोन घेण्यासाठी सिबिल स्कोर अत्यंत महत्त्वाचा असतो. हा सिबिल स्कोर मिळवण्यासाठी आता पर्यंत युजर्स ला सिबिल वेबसाईटवर जावं लागत होतं. त्याचबरोबर सिबिल स्कोर पाहण्यासाठी प्रीमियम घेणे देखील महत्वाचे होते. परंतु आता कुठेही न जाता आणि प्रीमियम न घेता तुम्हाला गुगल पे च्या माध्यमातून सिबिल स्कोर समजू शकेल. तर जाणून घेऊया गुगल पे कशाप्रकारे सिबिल स्कोर दाखवते.

गुगल पे वर सिबिल स्कोर चेक करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा- (Google Pay Cibil Score)

1) सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या गुगल पे ॲप अपडेट करणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला या अपडेटचा लाभ मिळेल.
2) त्यानंतर गुगल पे च्या होम स्क्रीन वर जा.
3) नंतर गुगल पे स्क्रोल करा.
4) तुम्हाला चेक सिबिल स्कोर फ्री हे ऑप्शन दिसेल.
5) या ऑप्शन वर क्लिक करा
6) त्यानंतर लेट्स चेक हे ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा.
7) लेट्स टेक नंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल.
8) या पेजवर तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर दिसेल.
9) त्यानंतर या ठिकाणी तुमचे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकावे लागेल.
10) यानंतर कंटिन्यू ऑप्शन वर क्लिक करा.
11) आणि तुम्हाला आता तुमचा सिबिल स्कोर दिसेल.
12) जर तुम्हाला सिबिल रिपोर्ट बघायचा असेल तर सिबिल स्कोर च्या खाली कंटिन्यू असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
13) त्यानंतर लेटर या ऑप्शन वर क्लिक करून सी फुल रिपोर्ट यावर क्लिक करा.
14) यानंतर तुम्हाला सिबिल रिपोर्ट मिळेल. (Google Pay Cibil Score)

सिबिल स्कोर म्हणजे काय?

बँकेकडून लोन देण्यापूर्वी तुमचा सिबिल स्कोर चेक केला जातो. या सिबिल स्कोर वरूनच तुम्ही लोन घेण्यासाठी पात्र आहात की नाही हे ठरवलं जातं. त्याचबरोबर जर तुमचा सिबिल स्कोर हा खूप कमी असेल तर तुम्हाला लोन मिळणं खूप अवघड असतं. तरीही जर तुम्हाला बँकेकडून लोन देण्यात आलं तर बँकेकडून या कर्जावर जास्त व्याज लावले जाते. सिबिल स्कोर हा 300 ते 900 या किमतीमध्ये ठरवला जातो. जर तुमचा सिविल स्कोर 750 पेक्षा जास्त असेल तर ते लोन घेण्यासाठी योग्य मानले जाते. सिबिल स्कोर हे एखाद्या व्यक्तीची क्रेडिट हिस्ट्री दाखवतो. त्यानुसार या व्यक्तीने केव्हा आणि किती कर्ज घेतलेलं आहे. हे समजतं. त्याचबरोबर जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे आणि तुम्ही ते वापरत असाल तर तुम्ही किती रक्कम देयक लागतात हे देखील या सिबिल स्कोर मध्ये समजते. सिबिल स्कोर ला क्रेडिट स्कोर देखील म्हटले जाते.