Google Pay चा ग्राहकांना दणका!! रिचार्ज केल्यावर घेणार ज्यादा पैसे

बिझनेसनामा ऑनलाईन । तुम्ही अधिकाधिक Google Pay चा वापर करून पैश्यांची कामे करता का? हो तर हि बातमी तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे कारण आता Google Payचा वापर करून मोबाईल रिचार्ज करताना देखील एका विशिष्ठ रक्कमेला कात्री लावली जाणार आहे. कंपनीने याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नसली तरीही आता Google Pay ने सुविधा शुल्काच्या नावाखाली मोबाईल रिचार्जवर पैसे घेणे सुरू केलेत अश्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आत्तापर्यंत मोबाईल रिचार्जवर त्यांच्याकडून कोणतेही अतिरिक्त आकारली जात नव्हती पण आता तुम्हाला वेगळे शुल्क द्यावे लागणार आहे.

अनेक सोशल मिडिया युजर्सचा दावा : Google Pay

Google Pay ने स्वतः नवीन बातमी बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसली तरीही काही सोशल मिडिया युजर्सनी मोबाईल रिचार्जवर त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाण्याचा दावा केला आहे. यापूर्वी PhonePay, PayTM सारख्या कंपन्या आधीपासूनच अश्या प्रकारचे शुल्क आकारायच्या मात्र आता GooglePayचा देखील यात समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोबाईल वरूनच स्वतः रिचार्ज मारणाऱ्या ग्राहकांना हा मोठा धक्का आहे. रिपोर्टनुसार, 100 रुपये किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या रिचार्जसाठी कोणतेही अतिरिक्त चार्ज लागणार नाही. मात्र 200-300 रुपयांपर्यंतच्या रिचार्जसाठी 2 रुपये आणि त्यापेक्षा जास्त रिचार्जसाठी 3 रुपयांचे शुल्क भरावे लागेल.

खरं आजच्या ऑनलाईन युगात अनेक कामं घरबसल्या करता येतात. मग ते टीव्हीचं बिल भरणं असुदे किंवा कोणाला मोठी रक्कम ट्रान्स्फर कारण. छोट्या मोठ्या कामांसाठी पायपीट करत बँकच्या दारी जाण्याची गरज राहिलेली नाही. या ऑनलाई सुविधा बाजारात येण्याआधी आपण दुकानात जाऊन मोबाईल रिचार्ज (Google Pay) करायचो पण नवीन तांत्रिकी बदलांमुळे ते कष्टही बऱ्याच प्रमाणात कमी झाले. मात्र गुगल पे आणि फोन पे सारख्या कंपन्यांनी जर ग्राहकांकडून अशाच प्रकारे चार्ज घेतले तर मात्र ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.