Google Pay Loan : गुगल देतंय कर्ज!! घरबसल्या घ्या लाभ; कसे ते पहा

Google Pay Loan : तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वोकृष्ट टेक कंपनी म्हणजेच गुगल आपल्या जगभरातील ग्राहकांसाठी एक खास आणि आनंदाची बातमी घेऊन आली आहे. गुगल नेहमीच नवनवीन योजना आणून ग्राहकवर्गाला आश्चर्यचकित करत असते. यावेळी सुद्धा अशीच एक रंज्यक गोष्ट कंपनीने बाजारात आणली आहे. Google आपल्या ग्राहकांना चक्क कर्ज देत आहे, ते सुद्धा घरबसल्या … यासाठी नेमकी काय प्रोसेस आहे? किती रुपयांचं कर्ज गुगल देतेय आणि आणि या कर्जाची परतफेड करताना तुम्हाला किती रुपये परत करावे लागतील याबाबत संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊयात.

गुगलचे एप देणार लोन : Google Pay Loan

आता गुगलच्या वापरकर्त्यांना कोणत्याही बँक किंवा आर्थिक संस्थांच्या पायऱ्या झीझावण्याची गरज उरलेली नाही, कारण Google Pay for Business या अँप वरून तुम्ही घर बसल्या कर्ज मिळवू शकता. गुगलच्या या नवीन योजनेचा फायदा अनेक लहानसहान व्यापाऱ्यांना होणार आहे, कारण इथे वापरकर्त्यांना 15 हजार रुपयांपर्यंत लोन दिले जाईल. गुगलने या प्रक्रियेला सैशे असे नाव दिलेले असून हे एक प्री-अप्रूवड लोन असणार आहे, ज्याची मुदत 7 दिवस ते 12 महिने म्हणजेच एक वर्षापर्यंत असेल.

गुगलने का आणली कर्जाची सुविधा?

लहामोठ्या व्यापाऱ्यांच्या गरजा ओळखून हि लोनची प्रक्रिया (Google Pay Loan) आपण सुरु केल्याची माहिती गुगलने दिली आहे. GooglePay, DMIFinance यांच्या सोबत तुम्ही सैशे या योजनेचा वापर करून घेऊ शकता. इथे गुगल तुम्हाला 15 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळवून देईल ज्याची परतफेड तुम्ही 111 रुपयांचा हप्ता भरून करू शकता, या साठी गुगलने चार बँकांसोबत करार केलेला आहे. या चार बँकांमध्ये ICICI, कोटक महिंद्रा बँक, फेडरल आणि HDFC बँकेचा समावेश होतो.

कसे मिळवलं गुगल कडून कर्ज-

गुगलकडून लोनची सुविधा (Google Pay Loan) दोन टीयर शहरांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे.
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोअरवर जाऊन Google Pay for Business हे ॲप इन्स्टॉल करून घ्यावे लागेल.
त्यानंतर लोनच्या विभागात जाऊन, ऑफर हा पर्याय निवडून तुमच्या इच्छेनुसार लोनची रक्कम टाकावी लागेल
यानंतर KYC च्या काही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कर्ज पुरवठा केला जाईल.