Google Salary Hike: जिथे कंपन्या आर्थिक मंदीसमोर हात टेकून कर्मचाऱ्यांना बाहेरचा रास्ता दाखवत आहेत, तिथे जगभरातील एका प्रसिद्ध कंपनीने कर्मचाऱ्याला थांबवण्यासाठी पराकाष्ठा केली. ही कंपनी कोणती असा प्रश्न पडला ना? चला मग जाणून घेऊया संपूर्ण घटना. तर झालं असं की एका गुगलच्या कर्मचाऱ्याला दुसऱ्या कंपनीतून ऑफर आली होती आणि तो गुगलमधली आपली नोकरी सोडून जाणार होता. पण त्याला रोखून ठेवण्यासाठी, गुगलने त्याच्या पगाराची वाढ केली, ती पण तब्बल तीनशे टक्के!
गुगलचे एकूण प्रकरण आहे तरी काय? (Google Salary Hike)
गूगलमध्ये काम करणाऱ्या एक कर्मचाऱ्याला Google ने त्यांची नोकरी सोडण्यापासून रोखण्यासाठी तब्बल 300 टक्के पगार वाढ दिली, आणि या बातमीची सध्या चर्चा सुरू आहे. या कर्मचाऱ्याला IIT मद्रासच्या माजी विद्यार्थ्याने सुरू केलेल्या Perplexity AI या स्टार्टअपमध्ये नोकरी मिळाली होती, पण गूगलने त्यांचा पगार इतका वाढवला की त्याला आणखीन वेगळ्या कंपनीमध्ये जाण्याची इच्छा देखील वाटू नये.
गूगलच्या या नवीन यशस्वी कामगिरीबद्दल चर्चा होत आहे कारण कंपनीमध्ये सध्या कर्मचारी कपाती सुरू आहेत. या वर्षी जानेवारीमध्येच, अनेक विभागांमध्ये कर्मचारी कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार,hardwear, central engineering आणि google assistant या विभागांमधून सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. याआधी 2023 मध्येही कंपनीने 12,000 कर्मचारी कमी केले होते. लक्ष्यात घ्या आत्ताच्या घडीला केवळ गूगलच नाही, तर अनेक इतर technology कंपन्यांमध्येही मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपाती झाल्या आहेत तर काहींनी अलीकडेच येणाऱ्या काळात कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.