Google चा मोठा निर्णय!! तुमचेही Gmail, Youtube अकाउंट होणार बंद

बिझनेसनामा ऑनलाईन । जर तुम्ही इंटरनेट वापरत असाल तर नक्कीच तुमचे जीमेल अकाउंट असेल, कारण गुगल वापरण्याची जीमेल अकाउंट असंणे गरजेचं असत. परंतु आता गुगलनेच एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्याचा फटका तुम्हाला सुद्धा बसू शकतो. गुगलने एक नवीन जाहीर केले आहे ज्यामध्ये हजारो, संभाव्यत: लाखो खाती जी २०२१ पासून वापरली गेली नाहीत ती कायमची हटविली जातील. किमान‌ दोन वर्षांपासून वापरली गेली नाहीत किंवा साइन इन‌ केलेली नाहीत असे जीमेल, गुगल ड्राइव्ह आणि फोटोजचे अकाउंटस कायमचे बंद केले जातील.

सुरक्षिततेच्या कारणावरून गुगलचा निर्णय-

सदर घोषणा करणाऱ्या ब्लॉग पोस्टमध्ये गुगलने म्हटले आहे की हे नवीन धोरण प्रामुख्याने सुरक्षिततेच्या कारणांवर नजर ठेवत बनले गेले आहे, कारण जुनी खाती स्पॅम, फिशिंग स्कॅम आणि हायजेकींग यांसारख्या कारणांमुळे अधिक असुरक्षित असतात.आमचे अंतर्गत विश्लेषण असे दर्शविते की वापरात नसलेल्या खात्यांची २ स्टेप व्हेरिफिकेशन सेट अप असण्याची शक्यता सक्रिय खात्यांपेक्षा किमान १० पट कमी आहे,” असे कंपनीचे वाईस प्रेझीडंट रूथ क्राचेली यांनी पोस्टमध्ये नमुद केले आहे. म्हणजेच ही खाती अनेकदा असुरक्षित असतात आणि एकदा खात्याशी तडजोड झाली की ओळख चोरीपासून ते स्पॅमसारख्या अवांछित गोष्टींसाठी वापरले जाऊ शकतात.

1 सप्टेंबर 2023 पासून प्रक्रिया सुरू-

जुनी खाती काढून टाकणे ह्याचा अर्थ केवळ Gmail चा access गमावणे असा असणार नाही. Google Docs, Google Workspace, Google Photos आणि इतर Google उत्पादनांमधील काम देखील डीलिट केली जाईल, जसे की वापरकर्त्याने YouTube वर अपलोड केलेले व्हिडिओ देखील डिलीट होतील. हे धोरण केवळ वैयक्तिक खात्यांना लागू होईल, ज्या शाळा आणि व्यवसाय यांसारख्या संस्थांशी संबंधित आहेत ते हटवले जाणार नाहीत. यावर्षी 1 सप्टेंबर 2023 पासून वापरता नसलेली खाती काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल

टेक जायंटने सांगितले की आम्ही टप्प्याटप्प्याने पावले उचलू, सुरुवात ही अशा खात्यांपासून होईल‌ जी तयार केली गेली असून पुन्हा कधीही वापरली जाणार नाहीत. खाते हटवण्यापूर्वी, आम्ही ईमेल पत्ता ( Email Address) आणि पुनर्प्राप्ती ईमेल( Recovery Email) दोन्हीव्दारे काही महीने अगोदर सुचना पोहोचवू. अशावेळी वापरकर्ते खात्यावर पाठवलेला ईमेल वाचून त्यांचे खाते हटवू इच्छित नसल्यास Gmail, Google Drive, YouTube किंवा Google Search सारख्या इतर कोणत्याही Google सेवेत साइन इन करून किंवा Google Play Store वरून कोणतेही अॅप डाउनलोड करून आपला अकाउंट सक्रिय ठेवू शकतात.

Google जवळ अशी अब्जावधी वापरकर्ते खाती आहेत त्यापैकी त्यांनी किती निष्क्रिय आहेत हे अद्याप सार्वजनिक केलेले नाही. कंपनीने म्हटले आहे की, सध्याचे सदस्यत्व( Subscription) असलेले कोणीही Google खाते, जसे की न्यूज आउटलेटशी लिंक केलेले खात्याला सक्रिय वापरकर्ता मानले जाईल आणि त्यांचे खाते हटविले जाणार नाही.