Google Jobs: जुन्या काळात एखाद्या गोष्टीचा संदर्भ हवा असेल किंवा काही महत्त्वाची माहिती हवी असेल तर आपण आजूबाजूच्या माणसांशी चर्चा करायचो किंवा पुस्तकांचा संदर्भ घ्यायचो, मात्र आता गुगलच्या येण्याने हे काम सोपं झालं आहे. केवळ काही बटन फिरवून आपण जगभरातली कोणतीही माहिती मिळवू शकतो. इंटरनेट आणि गुगल(Google) हे आता एकमेकांशी पूर्णपणे जोडले गेले आहेत, त्यामुळे कधी-कधी अनेकांचा इंटरनेट म्हणजेच गुगल असाही मानस होतो. जगभरात वाढणारी गुगलची ही क्रेझ तुम्हाला देखील फायदेशीर ठरू शकते. घरबसल्या गुगलचा वापर करून तुम्ही देखील भरपूर पैसे कमावू शकता. इथे व्यवसायाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे तुमची इच्छा, आवड आणि कौशल्य यानुसार एका पर्यायाची निवड करावी.
गुगलच्या सहाय्याने पैसे कमावता येतात? (Google)
गुगलचा वापर हा केवळ सर्च इंजिनसाठी न करता वेगवेगळ्या प्रकारे पैसे कमावण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. मात्र इतर क्षेत्रांप्रमाणे इथे देखील तुम्हाला प्रयत्न आणि कष्ट करण्याची आवश्यकता आहे. घरबसल्या जरी काम करण्याची संधी मिळणार असली तरी देखील मेहनत आणि चिकाटी याशिवाय पर्याय नाही. गुगलच्या मदतीने भरघोस पैसा कमावला जाऊ शकतो पण त्यासाठी कठोर परिश्रमांची सुद्धा तेवढीच गरज असते. आपण करणाऱ्या कामात सातत्य ठेवावे लागते.
सर्वातआधी गुगल(Google) या सर्च इंजिनचा वापर करून तुम्हाला नेमकं कोणतं ध्येय गाठायचं आहे हे निश्चित करा. तुम्हाला नेमका नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे की असलेलाच व्यवसाय अजून वृद्धिंगत करायचा आहे याचा निर्णय पक्का करा. यानंतर तुम्हाला नेमक्या कुठल्या क्षेत्रात आवड आहे, तुमचा कल कुठल्या क्षेत्राकडे अधिक आहे तसेच कौशल्याचा वापर करून कुठे सर्वात जास्त फायदा केला जाऊ शकतो याचा विचार करा. यानंतर तुम्हाला ध्येय साध्य करण्यासाठी एक नियोजन पत्र तयार करावं लागेल.
गुगलचा वापर करून कसे पैसे कमवाल?
गुगलचा वापर करून पैसे कमवायचे असल्यास गुगल सर्व्ह याचा वापर करा. यामध्ये जर का तुम्ही काम करणार असाल तर गुगलने दिलेले प्रॉडक्ट आणि सेवा यांबद्दल तुम्हाला लोकांकडून त्यांची मतं म्हणजेच Feedback गोळा करायचे असतात आणि यासाठीच गुगल तुम्हाला पैसे देतो. तसेच गुगल ऑफिलीएट हा एक मार्केटिंग प्रोग्राम असून इथे वेगवेगळ्या कंपन्यांच्या उत्पादनांचे किंवा सेवांचे Marketing म्हणजेच प्रचार करण्यासाठी तुम्हाला पैसे दिले जातात.
याशिवाय गुगल क्लाऊड प्लॅटफॉर्म याचा वापर करून तुम्ही ग्राहकांकडून सेवाशुल्क आणि सदस्यता शुल्क घेऊ शकता. गुगलवर(Google) सर्वात परिचित आहे तो म्हणजे प्ले-स्टोअर (Play Store). प्ले स्टोअरवर विविध प्रकारचे ॲप्स उपलब्ध असतात, वेगवेगळ्या ॲप्सच्या विक्रीसाठी आपण हा एक बाजार आहे असे म्हणूया. तुम्ही जर का तुमचा एखादा ॲप बनवून प्ले स्टोअरवर विकणार असाल तर याशिवाय पैसे कमावण्याची अजून चांगली संधी असू शकत नाही. तुम्ही गुगलवर वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती देऊन बदल्यात पैसे मिळवू शकता.