Government Investment Schemes : कमी खर्चात मोठी गुंतवणूक करायचीय? मग ‘या’ सरकारी योजना एकदा पहाच

Government Investment Schemes : सध्याच्या महागाईच्या काळात भविष्याच्या दृष्टीने आर्थिक तजवीज करणे आवश्यक आहे. त्यासाठी पैशाची गुंतवणूक करून भविष्यात तो पैसा आपल्याला उपयोगी येईल या उद्देशाने आपण कुठे ना कुठे पैशाची गुंतवणूक करत असतो. सरकार सुद्धा सर्वसामान्य माणसाला उपयुक्त अशा काही योजना राबवत असतात. तुम्ही सुद्धा कमी खर्चात मोठी आणि सुरक्षित गुंवतणूक करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही गुंतवणुकीच्या सरकारी योजना सांगणार आहोत ज्यामाध्यमातून तुम्ही भविष्यात मोठी रक्कम जमा करू शकाल.. चला तर जाणून घेऊयात या योजना नेमक्या कोणत्या आहेत ते….

१) नेशनल साविंग सर्टिफिकेट ( National Saving Certificate):

हा भारत सरकारने सुरु केलेला एक बचतीचा (Government Investment Schemes) मार्ग आहे. इथे तुम्हाला गुंतवणूक करता येतेच पण सोबतच लागणाऱ्या करात कपात केली जाते. एका निश्चित कालावधीसाठी गुंतवणूक केल्यानंतर भविष्यात सुख सुविधांचा अनुभव घेता येतो. भारत सरकारकडून पोस्ट ऑफिस बचत योजने अंतर्गत हि योजना चालवली जाते. गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय आणि कमी जोखीम असलेली योजना म्हणून हिला ओळखलं जातं. या योजनेअंतर्गत गुंतवणुकीवर 7.7 टक्क्यांचे व्याज दिले जाते. इथे कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त कितीही रकमेची गुंतवणूक करता येते, करमुक्त असलेली हि योजना पाच वर्षांसाठी काम करते पण शेवटच्या म्हणजेच पाचव्या वर्षी कर भरणे तुम्हाला बंधनकारक असते

२) पब्लिक प्रोवीडन्ट फंड ( Public Provident Fund): Government Investment Schemes

भारत सरकारकडून चालवली जाणारी आणखी एक जोखीम मुक्त योजना म्हणजे PPF. हि अनेक गुंतवणूक सेवांमधील एक प्रचलित अशी गुंतवणूक सेवा Government Investment Schemes) आहे. सरकारकडून चालवली गेल्यामुळे इथे गुंतवलेल्या पैश्यांची चिंता करण्याची गरज नसते. या योजनेचा प्रमुख उद्देश छोट्या गुंतवणूकदारांना मदत करणे असा आहे. इथे फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक करण देखील शक्य आहे. पहिल्या वर्षी गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला कोणताही कर भरावा लागत नाही आणि इथे मिळणारा व्याजदर हा 7.1 टक्के आहे.

३) सुकन्या समृद्धी योजना ( Sukanya Samruddhi Yojana):

भारत सरकारकडून “बेटी बचाव, बेटी पढाव” या योजने अंतर्गत हि गुंतवणूक सुरु केली. मुलीचे पालक मुलगी 10 वर्षांची झाल्यानंतर तिच्या नावे एक खातं तयार करत काही रक्कम गुंतवू शकतात. इथे कराच्या रकमेवर अनेक सवलती दिल्या जातात तसेच मिळणारा व्याज दरही आकर्षक आहे. मात्र एका घरातून केवळ दोन मुलींच्या नावे हि गुंतवणूक केली जाऊ शकते, तसेच एका मुलीच्या नवे फक्त एकाच खातं उघडण्याची परवानगी आहे. जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँक मध्ये जाऊन तुम्ही सुद्धा या योजनेचा भाग बनू शकता. या योजनेच्या माध्यमातून कमीत कमी 250 रुपयांपासून गुंतवणूक केली जाऊ शकते, आणि यावर मिळणारा व्याजदर हा 8% आहे.