Government Jobs : देशातील Top 8 सरकारी नोकऱ्या!! भरघोस पगार अन् भत्ता वेगळाच

बिझनेसनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी (Government Jobs) मिळावी हे प्रत्येक भारतीयांचं स्वप्न असतं. देशातील अनेक तरुण सरकारी नोकरी मिळण्यासाठी जीवाचं रान करत असतात. जेणेकरून त्यांना भरगोस पगारासोबतच बाकी सुविधांचा सुद्धा लाभ मिळू शकेल आणि आरामात नोकरी करून त्यांचा खर्च चालवू शकतील. खासगी नोकरी करून जितके पैसे मिळतात त्यापेक्षा अधिक पैसे सरकारी नोकरीमध्ये मिळतात आणि निवृत्तीनंतर अतिरिक्त फंड वगैरेही मिळतो. त्यामुळे तरुण पिढीचा कल सरकारी नोकरीकडे जास्त आहे. तुम्ही सुद्धा सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आज आम्ही देशातील टॉप १० सरकारी नोकऱ्यांबद्दल सांगणार आहोत, ज्याठिकाणी जर तुमची निवड झाली तर आयुष्याचे सोनं झालं म्हणायचं….

१) आईएएस (IAS)-

IAS या पदासाठी UPSC परीक्षा देणे गरजेचे आहे. एवढंच नव्हे तर आईएएस परीक्षा उत्तीर्ण (Government Jobs) झाल्यानंतर आयुक्त ही पदवी दिली जाते. आयुक्त ही एक भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहे. ते शासनाच्या मुख्यालयातील उच्च स्तरावर काम करते. त्याचबरोबर योजना व्यवस्थापन, डेव्हलपमेंट, अदान प्रदान व्यवस्थापन, विभागीय संचालन हे त्यांचे काम आहे. आयुक्तांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार दिला जातो. सुरुवातीला हा पगार 56 हजार 100 रुपये एवढा असतो. त्याचबरोबर प्रवास आरोग्य आणि राहण्याच्या सोयी सुविधा या सर्वांचे भक्ती देखील दिला जातो जातात. एवढेच नाही तर सरकारी गाडी आणि ड्राइव्हर देखील देण्यात येतो.

२) आयएफएस IFS – (Government Jobs)

IFS हे भारतीय परराष्ट्र सेवा म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर आयएफएस म्हणून या पदाला जास्त ओळख आहे. या पदासाठी आयएएस प्रमाणेच 56 हजार 100 रुपये वेतन दिले जाते. त्याचबरोबर प्रवास, आरोग्य, निवास यासाठी भत्ते यांसारख्या सुविधाही मिळतात. आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे काम आयएफएसला असते.

३) आयपीएस (IPS)

आयपीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पोलीस आयुक्त हे पद दिले जातं. हे राज्याच्या पोलिस विभागातील उच्चतम पद आहे. सामान्य प्रशासन कायदे शास्त्र आणि सुरक्षा व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये हे कार्य करत असतात. पोलीस आयुक्तांचा पगार हा सुरुवातीला 56 हजार 100 रुपये एवढा असतो, तर काही महिन्यांनी तो एक लाखाच्या वर पोहोचू शकतो. IAS आणि IFS प्रमाणे सर्व भत्ते आणि सुविधा उपलब्ध आहेत. या पदावर काम करताना प्रवास, आरोग्य, निवास भत्ता त्याचबरोबर सरकारी गाडी देखील देण्यात येते.

४) आरबीआय ग्रेड बी (RBI Grade B) –

आरबीआय म्हणजे भारतीय रिझर्व बँक. या ठिकाणी ग्रेड बी पदावर काम केलं जाते. यामध्ये मुख्य कार्याचे विवरण करणे पात्रता माहिती देणे परीक्षा प्रक्रिया वेतन वर्ग आणि इतर महत्त्वाची माहिती दिली जाते. हे एक महत्वाचं पद असून शेअर मार्केट व्यवस्थापन, आर्थिक नीती वित्तीय संस्थांचा निर्माण आणि नियोजन, वित्तीय बजेट निर्माण, बँकिंग संबंधित कार्य या पदासाठी राखीव असतात. या पदाधिकाऱ्यांना 67 हजार रुपये एवढा पगार सुरुवातीला असतो. त्याचबरोबर एचआरए टीए, डीए यासारखे भत्ते दिले जातात.

५) इस्रो आणि डीआरडीओ (ISRO and DRDO) –

इस्त्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ही स्पेस एजन्सी आहे. इस्रो मध्ये वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी दोन भूमिका स्पष्टपणे बजावला जातात. इस्त्रोने तयार केलेल्या उपकरणांचा वापर भारतीय स्पेस मध्ये अनुसंधान, संचार, मेटीओरोलॉजी, नेव्हिगेशन आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केला जातो. डीआरडीओ म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ही एक भारतीय सुरक्षा टेक्नॉलॉजी विकसित करणारी संस्था आहे. डीआरडीओ वैज्ञानिक,अभियांत्रिकी,विज्ञान, औद्योगिक तज्ञ आणि अन्य तंत्रज्ञानाचे काम करते. इस्रो आणि डीआरडीओ मध्ये काम करणाऱ्यांना सुरुवातीला 50 हजार पासून ते 60000 पर्यंत वेतन दिले जाते.

६) प्रोफेसर (Professor) –

भारतामध्ये टिचिंग फिल्ड हे एक आदर्श व सुरक्षित क्षेत्र मानले जाते. बरेच विद्यार्थी ज्या कॉलेजमध्ये ज्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेतात त्याच विद्यापीठांमध्ये टीचिंग साठी सुद्धा अप्लाय करत असतात. प्रोफेसर साठी महिन्याला 50000 इतका पगार असतो. त्यानंतर यामध्ये वाढ होऊन तो लाखांच्या आसपासही जातो. तर असिस्टंट प्रोफेसरला 60 ते 70 हजार रुपये सॅलरी दिली जाते.

७) न्यायाधीश (Judge) –

न्यायिक पदांची गर्विष्ठतम पदवी असलेल्या देशात जज होणे महत्त्वाचे आहे. कारण जज होणं हे खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचा रुबाब त्यांच्या सॅलरी पेक्षा सुद्धा जास्त असतो. हाय कोर्टातील एका जज ला दोन लाख 25 हजार रुपये दर महिन्याला दिले जातात. सर्वोच्य न्यायालयातील न्यायाधीशांना 2.50 लाख पगार दिला जातो.

८) इंजिनिअर (Engineer) –

भारत हा इंजिनिअर्सचा देश आहे. देशात दरवर्षी लाखो इंजिनिअर्स निर्माण होत आहेत. त्यातही भारतामध्ये सरकारी इंजिनियर्स (Government Jobs) ला जास्त महत्त्व आहे. या सरकारी इंजिनियर्सचे वेतन हे 50,000 पासून 60000 पर्यंत असते. त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात काम करणाऱ्या ठिकाणी मोठे पगार दिले जातात.