बिझनेसनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या (Government Jobs) शोधात असणाऱ्या युवकांना सुवर्णसंधी आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP) अंतर्गत तब्बल 458 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून चालकाची पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 जून पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून 26 जुलै 2023 ला अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा-
सर्वसाधारण वर्गासाठी 195 पदे
OBC साठी 110 पदे,
EWS साठी 42 पदे ,
SC साठी 74 पदे
ST प्रवर्गासाठी 37 पदे
पात्रता आणि वयाची अट काय असावी?
ITBP चालक कॉन्स्टेबल पदासाठी (Government Jobs) अर्ज करण्यासाठी सदर उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतील किंवा विद्यापीठातील दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे. या पदासाठी अर्जदाराचे वय 21 वर्षे ते 27 वर्षे असावे. त्याचबरोबर आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना या सरकारी नियमानुसार वयामध्ये काही टक्के सूट देण्यात येणार आहे.
फी किती ? (Government Jobs)
मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीसाठी अर्ज फीस नसून सामान्य,ओबीसी, ई डब्ल्यू एस वर्गातील उमेदवारांना शंभर रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
असा करा अर्ज-
ITBP कॉन्स्टेबल चालक पदासाठी अर्ज करण्यासाठी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर https://recruitment.itbpolice.nic.in/ वर जाऊन भरतीसाठीच्या लिंक फॉर्म वर जा. त्यावर क्लिक करा, त्यामध्ये आवश्यक असलेली वैयक्तिक माहिती भरा, त्यानंतर हा फॉर्म सबमिट करा. आणि डाऊनलोड करून प्रिंट काढा.