Government Scheme: केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत आणि त्यात अनेक गुंतवणूक योजनांचा समावेश होतो. नेहमीच अश्या योजनांचा मार्ग धरावा जिथे तुम्हाला उत्तम परतावा मिळण्यासह कर सवलतीचा लाभही दिला जाईल. भारत सरकार कडून गरजू आणि मागासलेल्या वर्गाला मदत करण्यासाठी काही योजना राबवल्या जातात, ज्यात सरकारने देशाच्या लाडक्या लेकींसाठी अशीच एक खास योजना सुरु केली आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला कर सवलतीसह जोरदार परतावा दिला जातो. या योजनेत 70 लाखांपर्यंत परतावा मिळण्याची शक्यता असल्याने तुम्हीही या योजनेत सहभागी होऊ शकता आणि तुमच्या लाडक्या लेकीचे भविष्य उज्ज्वल करू शकता.
काय आहे सुकन्या समृद्धी योजना? (Government Scheme)
मोदी सरकारने सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना ही एक अद्भुत योजना आहे जी तुमच्या लाडक्या लेकीच्या भविष्यासाठी बचत करण्याची उत्तम संधी देते. ही योजना पूर्णपणे करमुक्त आहे आणि यात तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने गुंतवणूक करू शकता. या योजनेतील गुंतवणूक आणि व्याज दोन्ही पूर्णपणे करमुक्त आहेत.तुम्ही दर महिन्याला 250 रुपये ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून परवडणाऱ्या किमतींमध्ये गुंतवणुकीला सुरूवात करू शकता. ही योजना आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख पर्यंत कर सवलतीचा लाभ देते आणि 21 वर्षांसाठी ती वैध असल्याने तुमच्या मुलीच्या शिक्षण आणि लग्न यांसारख्या खर्चांसाठी बचत करण्याची उत्तम संधी मिळते.
पालक नेहमीच आपल्या मुलीचे शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक तरतूद करण्याची कल्पना करतात. सुकन्या समृद्धी योजना (Government Scheme) अशाच दूरदर्शी पालकांसाठी एक उत्तम योजना आहे. 10 वर्षांपर्यंतच्या मुलीसाठी तुम्ही SSY मध्ये खाते उघडू शकता आणि मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षांपर्यंत या योजनेत गुंतवणूक करू शकता.