Government Schemes | लग्न हे एक पुरुष आणि स्त्री मधील सामाजिक बंधन आपण म्हणू शकतो. हिंदू धर्मामध्ये लग्न म्हणजे पवित्र नातं मानले जाते. बरेच जण स्वतःच्या मर्जीने लव मॅरेज करतात तर बरेच जण अरेंज मॅरेज म्हणजे आई वडिलांच्या पसंतीने लग्न करतात. आज-काल मुलं -मुली एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि स्वतः च्या मर्जीने प्रेमविवाह करतात. ज्याप्रमाणे अरेंज मॅरेज मध्ये आई-वडिलांच्या सहमतीने लग्न केलं जाते त्याप्रमाणे लव मॅरेज मध्ये होत नाही. कारण कुटुंबाकडून लव मॅरेजला विरोध असतो. या विरोधाचे कारण बऱ्याचदा आंतरजातीय विवाह देखील असतो. बऱ्याचदा मुलं मुली कुटुंबांचा नकार असल्यामुळे पळून जाऊन लग्न करतात. पण अशा मुली मुलांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सरकारने अशी एक योजना आणली आहे त्यामाध्यमातून आंतरजातीय लग्न करणाऱ्या मुलामुलींना अडीच लाख रुपये मिळतात.
काय आहे योजना- Government Schemes
डॉ.आंबेडकर फाउंडेशन यांच्याकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना मदत म्हणून 2.50 लाख रुपये दिले जातात. या योजनेसाठी (Government Schemes) काही नियम आणि अटी देखील ठेवण्यात आलेल्या आहेत. डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन यांच्याकडे अर्ज करण्यासाठी जोडप्यांपैकी एक व्यक्ती दलित आणि दुसरा व्यक्ती दलित समाजा व्यतिरिक्त असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर खालील गोष्टी लक्षात ठेवणे देखील गरजेचे आहे.
- जर तुम्ही डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन कडे अर्ज करणार असाल तर तुमचे लग्न हिंदू विवाह कायदा 1995 अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
- यासाठी तुम्हाला आंतरजातीय विवाह करणे गरजेचे आहे.
- त्याचबरोबर जे लोक पहिल्यांदा लग्न करत आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
- दुसऱ्यांदा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा लग्न करणाऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी घेता येणार नाही.
- जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्या लग्नाच्या एक वर्षाच्या आत तुम्ही या योजनेसाठी (Government Schemes)अर्ज करू शकतात.
- त्यानंतर फॉर्म भरण्यापासून ते तपासणी पर्यंत सर्व काही योग्य आढळल्यास या जोडप्यांना लाभ मिळणार आहे.