GPS Toll Collection : प्रवासात लांबचा पल्ला गाठत असताना काही टोल नाके पाहायला मिळतात. या टोल नाक्यांवर प्रत्येक वाहन चालकाला काही प्रमाणात टोल भरावा लागतो. काही दिवसांपूर्वी आपण रोख रक्कम देऊन टोल भरत असू, त्यानंतर वाहतूक मंत्रालयाकडून दिली गेलेली FASTag ची सुविधा तुम्हाला माहितीच असेल. आजकाल नवीन उत्पादनांमधून समोर येणाऱ्या गाड्यांवर आपल्याला FASTag पाहायला मिळतो. FASTag scan केल्यानंतर आपोआप तुमच्या अकाउंट मधून रक्कम सरकारच्या खात्यात जमा केली जाते. मात्र आता लवकरच देशभरात टोल स्वीकारण्याची ही पद्धत बदलणार आहे. नवीन युगात FASTag द्वारे नाही तर GPS च्या माध्यमातून वाहनचालकांकडून टोल आकारला जाईल. या नवीन सुविधेमुळे आता वाहन चालक टोल नाक्यांवर न थांबता सलग प्रवास करू शकणार आहेत. देशात FASTag ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेकांनी या प्रक्रियेला दुजोरा दिला होता, पण बदलत्या तांत्रिक युगात FASTag मागे टाकणारा GPS लवकरच भारतात कर वसुलीचे काम सुरु करेल.
मार्च 2024 पासून GPS Toll Collection सुरू :
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या तीन आठवड्यांपूर्वी देशात मार्च 2024 पासून GPS द्वारे टोल collection ला सुरुवात केली जाईल अशी माहिती दिली होती. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून देशभरात जवळपास दहा महामार्गांवर GPS Toll Collection बसवण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. प्रवाशांचे जीवन FASTag द्वारे काही अंशी सोपे झाले होते, मात्र त्याहूनही अधिक सोयीस्कर असलेली ही नवीन प्रक्रिया तुम्हाला सलग प्रवासाचा आनंद मिळवून देणार आहे.
लाईव मिंटने दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला GPS टोलची सुरुवात एका Pilot Project म्हणून केली जाईल. याचाच अर्थ असा की संपूर्ण देशभरात ही सेवा सुरू करण्याआधी काही ठराविक ठिकाणी या प्रणालीची अंमलबजावणी करून ती वाहनचालकांसाठी किती सोयीस्कर आहे याची तपासणी केली जाईल. या तपासणी दरम्यान जर का काही त्रुटी आढळून आल्या नाहीत तर मग देशभरात FASTag नाही तर GPS Toll Collection ला सुरुवात होईल.
काय आहे GPS Toll System?
GPS Toll Collection या नवीन प्रणालीमुळे गाड्यांना टोल नाक्यांवर थांबण्याची गरज राहणार नाही, कारण या प्रक्रियेचा वापर करून मार्गावरूनच टोल वसुली केली जाईल आणि नंतर निश्चित टोलनाक्यांची गरज संपुष्टात येईल. ही नवीन प्रक्रिया अंमलात आणण्यासाठी महामार्गाचे जिओफेन्सिंग केले जाईल जे Global Positioning System (GPS) किंवा Radio Frequency Activation (RFID) द्वारे पूर्ण होणार आहे.