Grocery Prices : सध्या महागाईचे दर अगदीच शिगेला पोहोचले आहेत. आपण आजकाल अधिक प्रमाणात फळभाज्या आणि पौष्टिक धान्याची निवड करतो परिणामी काय झालंय कि यांचे दर जोमाने वाढत चालेले आहेत. या परिस्थितीत जगणं हे काही सामान्य माणसाच्या हातातील गोष्ट नाही. आपण अपार कष्ट करून दैनंदिन गरजा भागवत असतो आणि दिवसेंदिवस वाढणारी ही महागाई आपलं जगणं मुश्कील करत आहे. आपला देश हा फळ भाज्यांच्या उत्पादनासाठी जगभरात ओळखला जातो, चीन नंतर जर का कुणी फळ- भाज्यांचा मोठा उत्पादक असेल तर ते आपण आहोत. मात्र काहीवेळ हवामान आणि इतर नैसर्गिक बदलांमुळे फळ भाज्यांचे नुकसान होते आणि परिणामी जास्त मागणी आणि कमी पुरवठ्यामुळे दरवाढ सोसावी लागते.
यावर्षी अशी झाली किंमतवाढ: Grocery Prices
आपल्या देशात फळ भाज्या,अन्न धान्य यांची मागणी कधीच कमी होणारी नाही. कारण हा आपला दररोजचा आहार आहे. यावर्षी पावसामुळे कांदे आणि बटाट्यांच्या किमतींमध्ये वाढ (Grocery Prices) झालेली पाहायला मिळाली. देशात मान्सूनची सुरुवात उशिरा झाली आणि त्यानंतर जुलै महिन्यात जोरदार पाऊस पडला पण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने मार्ग बदलल्यामुळे फळे आणि भाजीपाला उत्पादनाला मोठा फटका बसला होता.
देशातील एकूण भाजी आणि फळ उत्पादनात वाढ झाली असली तरी कापणी, पॅकेजिंग, वाहतूक आणि साठवणूक या सर्व गरजेच्या प्रक्रिया निभावताना याचे मोठे नुकसान होते आणि मग त्याचा फटका ग्राहकांना बसतो. वर्ष 2020 ते 2023 पर्यंत भाजीपाल्याच्या महागाईचा दर 2.5 टक्के होता पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर यंदाच्या वर्षी आपल्या देशात भाजी पाल्याचे उत्पन्न दुप्पट पटीने वाढले (Grocery Prices) आहे. परंतु भारतात अन्न धान्यांची मागणी हि दिवसेंदिवस वाढणारी असल्यामुळे उत्पादनाचा योग्य पुरवठा करण्यात आपण कुठेतरी कमी पडतो