Groww App Down: ऑनलाईन फायनान्शियल सर्व्हिस प्लॅटफॉर्म(Online Financial Service Platform) म्हणजेच Groww या ऍपच्या वापरात आज सकाळपासून काही वापरकर्त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला होता. हा ऍप एक तर गुंतवणूकदारांसाठी सर्वात महत्वाचा असल्यामुळे त्यांना परिणामी नुकसान सोसावं लागण्याची भीती मनात कायम होती. काही वापरकर्त्यांनी तर X या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. सध्या आपण वावरत असलेलं हे जग संपूर्णपणे टेक्नॉलॉजीचा अवलंब करण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे जराशी आलेली अडचण सुद्धा भलं मोठं नुकसान करू शकते.
Groww App Down असल्याने वापरकर्ते नाराज :
आज सकाळपासून Groww App ठीक चालत नसल्यामुळे अनेक वापरकर्त्यांनी सोशल मिडीयाचा वापर करून आपली नाराजी व्यक्त केली. काही तांत्रिक अडचणींमुळे या ऍपमध्ये बिघाड झालेला असला तरीही वापरकर्ते गुंतवलेल्या पैश्यांबद्दल चिंतीत आहेत आणि म्हणूनच त्यांनी थेट नुकसान भरपाईची मागणी करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करायला सुरूवात केली होती. सोशल मीडियावरचे पोस्ट पहिले तर तुमच्या लक्ष्यात येईल की आज घडलेल्या या प्रकारामुळे वापरकर्ते किती संतापले आहेत, अनेकांना ऍप सुरु करताक्षणी “Oops! Something went wrong” असा संदेश मिळाल्याने त्यांनी त्वरित याबद्दलची माहिती सोशल मीडियावर सर्वांसोबत शेअर केली होती.
यावर कंपनीची प्रतिक्रिया काय?
विचार करा की मोठमोठाली गुंतवणूक केली नसताना देखील एखाद दिवशी आपला मोबाईल बंद पडला किंवा दररोज वापरात असलेला ऍप बंद झाला तर आपण किती हैराण होतो. इथे तर अनेक लोकांच्या गुंतवणुकीचा गंभीर प्रश्न उभा राहिला होता. आपल्या वापरकर्त्यांची हीच नाराजी समजून घेत कंपनीने देखील परिस्थिती सांभाळण्याचा योग्य प्रयत्न केला, त्यांनी ग्राहकांना दिलासा देणारी एक पोस्ट X वर शेअर केली(Groww App Down). पोस्टमध्ये कंपनीने ग्राहकांना सहन कराव्या लागलेल्या असुविधांबद्दल माफी मागितली तसेच कंपनीकडून कर्मचारी हा प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असल्याची माहिती दिली, आणि शेवटी सर्वांनी धीर धरल्याबद्ल तसेच कंपनीला सहकार्य केल्याबद्दल प्रत्येक गुंतवणूकदाराचे आभार देखील मानले आहेत.