GST Collection : GST मुळे सरकार मालामाल!! सप्टेंबरमध्ये 1.63 लाख कोटींची कमाई; संपूर्ण देशात महाराष्ट्र अव्वल

GST Collection | GST (Goods and Service Tax) च्या वापरामुळे आपलं सरकार भरपूर श्रीमंत झालं आहे. एखादी गोष्ट विकत घेतना तुम्ही नकीच पाहिलं असेल कि त्यामगे GST अशी एक मोजकी रक्कम दिलेली असते. पण GST म्हणजे काय हे नेमकं माहिती आहे का? आपले पैसे GST म्हणजे नेमके कुठे आणि कशाला कापले जातात हे जाणून घ्या. आणि सोबतच सरकारी खजिन्याला GST चा कसा व किती फायदा झाला हे ही पहा.

सरकारच्या तिजोरीत GST Tax ने टाकली भर: GST Collection

केंद्र सरकारला गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये GST चा भरपूर फायदा झाला आहे. सप्टेंबर महिन्यात GST करातून मिळालेली रक्कम 1.63 लाख कोटी रुपये एवढी मोठी आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात हा आकडा 1.47 लाख कोटी रुपये होता, म्हणजेच आता यात 10.2% वाढ झालेली आहे.

सप्टेंबर महिन्याच्या आधीचा आकडा पहिला तर ऑगस्ट महिन्यात हि रक्कम 1.59 लाख कोटी रुपये होती, तर जुलै महिन्यात सरकारने GST च्या माध्यमातून 1.66 लाख कोटी रुपये कमावले (GST Collection) होते. सप्टेंबर महिन्यात सलग झालेली भरगोस कमाई सरकारची तिजोरी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरली आहे. या वर्षाच्या एप्रिल महिन्यात GST करातून भरपूर कमाई झाली होती, 1.87 लाख कोटी अशी हि रक्कम वर्ष 2023 मधली सर्वाधिक रक्कम आहे.

2023-24 वर्षात 9.93 लाख कोटींची कमाई:

विचार केला तर हे आर्थिक वर्ष सरकारसाठी फायदेशीर ठरलं आहे. 2023-24 या आर्थिक वर्षातील मागच्या पाच महिन्यात GSTने 9.93 रुपयांची कमाई (GST Collection) करून दिली आहे(GST Tax). मागच्या संपूर्ण आर्थिक वर्षात म्हणजेच 2022-23 मध्ये हा आकडा 18.10 लाख कोटी रुपये होता. यंदाच्या वर्षात केवळ पाच महिन्यात झालेली कमाई पाहता हे आर्थिक वर्ष अजून जास्त फायदेशीर होण्याची शक्यता दिसत आहे.

GST Taxच्या कमाईमध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर:

देशातील सगळ्या राज्यांच्या तुलतेन महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. 25,137 कोटी रुपयांचे संकलन करत महाराष्ट्राने हे स्थान मिळवले आहे. मागच्या वर्षच्या तुलनेत या दरात 17 टक्क्यांची वाढ पाहायला मिळते, त्यामुळे देशाबरोबरच राज्यासाठी सुद्धा हे आर्थिक वर्ष फायदेशीर बनलं आहे. देशाच्या इतर राज्यांनी सुद्धा मुबलक प्रमाणात कमाई केली असून कर्नाटक 11,693 कोटी रुपयांसह दुसर्या स्थावर आहे, तर 10,481 कोटी रुपये मिळवत तामिळनाडू तिसर्या स्थानी आहे.

GTS Tax म्हणजे काय व तो कधी लागू झाला?

GSTच्या रुपात आपण सरकारला अप्रत्यक्षपणे कर देत असतो. यात तीन प्रकार पाहायला मिळतात जसे कि CGST,SGST आणि IGST. सोबतच GSTच्या करामध्ये 5%,12%,18%,21% असे स्थरही असतात. वर्ष 2017 मध्ये सर्विस टेक्स, एक्ससाईझ डीयुटीज इत्यादी प्रकारच्या करांना कायमचं हटवत सरकारने GSTची सुरुवात केली होती.