GST Collection: फेब्रुवारी 2024 मध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) महसूल संकलनात दमदार वाढ झाली आहे. या महिन्यात 1,68,337 कोटी रुपयांचे GST जमा झाले आहे, जो 2023 मधील याच महिन्याच्या तुलनेत 12.5 टक्के अधिक आहे. ही वाढ देशांतर्गत व्यवहारांमध्ये 13.9 टक्के आणि आयातीतून 8.5 टक्के वाढीमुळे शक्य झाली आहे आणि हे आकडे अर्थव्यवस्थेच्या सकारात्मक दिशेने जात असल्याचे दर्शवतात.
GST संग्रहात दमदार वाढ: (GST Collection)
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये GST संग्रहात दमदार वाढ झाली आहे. सरासरी मासिक सकल GST संग्रह 1.67 लाख कोटी रुपये इतका असल्याने तो मागील वर्षीच्या तुलनेत 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. याच आर्थिक वर्षात एकूण GST संग्रह 18.40 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.7 टक्क्यांची वाढ दर्शवतो, निव्वळ महसूलही 1.51 लाख कोटी रुपयांवर गेला आहे(GST Collection) हे सगळे आकडे पहिले तर नक्कीच सरकारला करदात्यांकडून अधिकाधिक उत्पन्न मिळत आहे.