GST Collection In March: सरकारची तिजोरी भरली; मार्च महिन्यातील GST संकलनाचा आकडा “दमदार”

GST Collection In March: तुम्ही अनेक दिवसांपासून वाचलं आणि ऐकलं असेलच की भारताची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे आणि आज समोर आलेल्या बातमीनुसार त्याचे पुरावे मार्च महिन्याच्या GST संकलनातून दिसून येतात. अर्थ मंत्रालयाकडून आज म्हणजेच सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च 2024 मध्ये GST संकलन 1.78 लाख कोटी रुपये इतका झाला आहे आणि महत्वाची बाब म्हणजे हा आतापर्यंतच्या दुसऱ्या क्रमांकावर जाणारा संग्रह ठरला आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 11 टक्क्यांची वाढ झाली आहे.

GST संकलनात जबरदस्त वाढ: (GST Collection In March)

आजपासून देशात नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे आणि मागच्या संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये GST संकलनात विक्रमी वाढ झाली असल्याची माहिती देखील आज उघड झाली. गेल्या वर्षात देशात एकूण 20.14 लाख कोटी रुपये इतका GST जमा झाला आहे, जो आधीच्या वर्षाच्या तुलनेत 11.7 टक्क्यांनी अधिक आहे आणि यामुळे सरकारची तिजोरी भरली आहे आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.

ही वाढ इतकी मोठी आहे की, आत्तापर्यंतच्या एकूण GST संकलनात मार्च महिन्याचा दुसरा क्रमांक लागतो(GST Collection In March). सर्वाधिक GST संकलन जरी एप्रिल 2023 मध्ये झालं होतं, तरीही मार्चच्या महिन्याच्या आकड्याने या अंकांना अगदी सहजपणे मागे खेचलं आहे.

मार्च 2024 मध्ये जमा झालेल्या GST मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या करांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, केंद्र सरकारच्या वस्तू आणि सेवा करातून (CGST) 34,532 कोटी, राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करातून (SGST) 43,746 कोटी, एकत्रित वस्तू आणि सेवा करातून (IGST) आयातित वस्तूंवर 40,322 कोटीसह एकूण 87,947 कोटी आणि उपकर म्हणून 12,259 कोटी (आयातित वस्तूंवर 996 कोटीसह) इतका कर वसूल झाला आहे. यावरून अंदाज येतो की अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि कर प्रशासनातील कार्यक्षमता वाढल्यामुळे GST संग्रहात वाढ होत आहे. हे आर्थिकदृष्ट्या सकारात्मक असून देशाच्या विकासाला चालना देणारे आहे.